शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

Raigad: अखेर घारापुरी बेटावरील वीजपुरवठा सुरू, महिनाभर पावसात केले अथक प्रयत्न

By नारायण जाधव | Updated: July 27, 2023 16:06 IST

Raigad: १५ जून २०२३ रोजी घारापुरी बेटावर वीजपुरवठा करणाऱ्या तीन केबल पैकी एक सिंगल कोर समुद्राखालील केबल नाव्हा खाडी ते मोराबंदर दरम्यान समुद्रामध्ये नादुरुस्त झाल्याने बेटावरील राजबंदर, शेतबंदर, मोराबंदर या तिन्ही गावचा वीजपुरवठा खंडित झाला होता.

नवी मुंबई - १५ जून २०२३ रोजी घारापुरी बेटावर वीजपुरवठा करणाऱ्या तीन केबल पैकी एक सिंगल कोर समुद्राखालील केबल नाव्हा खाडी ते मोराबंदर दरम्यान समुद्रामध्ये नादुरुस्त झाल्याने बेटावरील राजबंदर, शेतबंदर, मोराबंदर या तिन्ही गावचा वीजपुरवठा खंडित झाला होता. हा वीजपुरवठा  २ फेज द्वारे चालू केला होता. परंतु, थ्री फेज वीजपुरवठा नसल्याने पाणीपुरवठा करणारी मोटर बंद असून समुद्राच्या आत असलेल्या केबल मधील दोष शोधण्याचे काम महिना भरापासून सुरु होते. अधिकारी व कार्माच्यार्यांचा अथक प्रयत्नानंतर सर्व परिस्थितीवर मात करून वीजपुरवठा सुरळीत केला आहे. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी घारापुरीचा वीजपुरवठा लवकरात लवकर सुरळीत करण्याचे निर्देश दिले होते. या कामाबाबत संचालक    (संचलन) संजय ताकसांडे यांच्याकडून सातत्याने आढावा घेण्यात येत आहे.

घारापुरी येथील दोन नादुरुस्त सिंगल कोर समुद्राखालील केबल मधील दोष न्हावाखाडी ते मोरा बंदर दरम्यान समुद्राचा आत असल्याने तसेच वादळ वाऱ्यासहित प्रचंड मुसळधार पाऊस, समुद्रातील भरती ओहोटी व त्यामुळे  उदभवणारी अपरिहार्य परीस्थितीवर मात करत सदरचे काम प्रगती पथावर चालू असून नादुरुस्त सिंगल कोर केबलमधला दोष शोधण्यासाठी महावितरणच्या पनवेल शहर विभागातील कर्मचारी मागील एक महिन्यापासून युध्दपातळीवर प्रयत्न करत होते.  सह व्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे व  भांडूप परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनिल काकडे यांनी जातीने लक्ष देऊन कामाला गती देण्यासाठी वाशी विभागाचे अधीक्षक अभियंता (प्रभारी), सिंहाजीराव गायकवाड यांना विशेष सूचना दिल्या. मागील महिना भरापासून संततधार पावसात अविरत काम करून वीजपुरवठा सुरळीत करण्यात आले आहे. त्यामुळे, बेटावरील तिन्ही गावांचा पाणी पुरवठाची  समस्या सोडवण्यात आली आहे.

आपल्या जीवाची पर्वा न  करता  प्रतिकूल परिस्थितीवर मात करून महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी समुद्र खालचे दोष शोधून काम पूर्ण करून वीजपुरवठा सुरळीत केल्याबद्दल  बेटावरील तिन्ही गावचे ग्रामस्थांनी  महावितरणचे आभार मानले आहे. या कामासाठी, पनवेल शहरचे कार्यकारी अभियंता सतीश सरोदे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता देविदास बैकर सहाय्यक अभियंता रणजीत देशमुख व विभागातील प्रत्येक कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेऊन या कठीण कामाला यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे.

टॅग्स :Raigadरायगडelectricityवीज