शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Raigad: उन्हाचे चटके मुलांनाही नकोसे, मैदाने पडली ओस; बैठ्या खेळांना पसंती

By निखिल म्हात्रे | Updated: April 19, 2024 10:13 IST

Raigad News: शाळांना सुट्ट्या लागल्या की घराचे अंगण, सोसायट्यांचे पॅसेज आणि मैदानांवर मुलांचे मैदानी खेळ रंगतात; मात्र गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला आहे. त्याचा परिणाम म्हणून रायगड जिल्ह्यातील बहुसंख्य मैदाने सकाळी नऊनंतर ओस पडू लागली आहेत.

- निखिल म्हात्रे अलिबाग - शाळांना सुट्ट्या लागल्या की घराचे अंगण, सोसायट्यांचे पॅसेज आणि मैदानांवर मुलांचे मैदानी खेळ रंगतात; मात्र गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला आहे. त्याचा परिणाम म्हणून रायगड जिल्ह्यातील बहुसंख्य मैदाने सकाळी नऊनंतर ओस पडू लागली आहेत.

बहुतांश मुलांच्या वार्षिक परीक्षा नुकत्याच संपल्या आहेत. दोन महिने सुट्टी मिळत असल्याने या दिवसांत मैदानी खेळाकडे मुलांचा कल वाढतो; परंतु उन्हाच्या झळा या असह्य असल्याने घरातील बैठे खेळ खेळणेच मुले पसंत करत आहेत. पालक काळजीपोटी उन्हामुळे बाहेर मैदानात मुलांना खेळायला पाठवत नाहीत. परिणामी, मैदानी खेळांवर याचा परिणाम दिसून येत आहे.

मैदानी खेळांकरिता सायंकाळी सातनंंतर मुले बाहेर पडत आहेत. तसेच सकाळी नऊ वाजतापर्यंतच मुले बाहेर फेरफटका मारत असून १० नंतर सूर्य डोक्यावर चढू लागला की मुले घराचा रस्ता धरतात. यामुळे सकाळी १० ते संध्याकाळी सहा या वेळेत मैदान मुलांविना मैदाने ओस पडत आहेत. शाळांना सुट्टी लागताच मैदाने मुलांच्या किलबिलाटाने गजबजून जातात. तसेच उन्हाळी खेळांची शिबिरे देखील भरवली जातात. मात्र, यंदा उन्हाचा तडाखा पाहता अद्याप या शिबिरांना सुरुवात झालेली नाही. यामुळे परीक्षा संपून घरात अडकलेल्या मुलांना नक्की कोणत्या खेळात आता गुंतवायचे, असा मोठा प्रश्न पालकांसमोर पडला आहे. नाटक, नृत्य, चित्रकला अशा बैठ्या प्रकारांतील कला शिबिरांना पालक मुलांना घालून त्यांची मनधरणी करत आहेत; परंतु खेळायला काही मिळत नसल्याने मुले देखील खेळांच्या शिबिरांची वाट पाहत आहेत.- दर्शन म्हात्रे, पालक

वाढत्या उन्हामुळे बैठ्या खेळाकडे मुलांचा कल दिसत आहे. तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे जात असल्याने मुले घरीच थांबणे पसंत करत आहेत. तसेच कुलर, फॅनखाली अथवा वातानुकूलित खोल्यांमध्ये बसून मोबाइल गेम, टीव्ही, लॅपटॉप अथवा कॉम्प्युटर ऑनलाइन गेमिंग, कॅरम अशा बैठ्या खेळाला पसंती देताना मुले पसंती देत आहेत.- यतिराज पाटील, क्रीडा शिक्षक मैदानी खेळ खेळताना शारीरिक ऊर्जा जास्त प्रमाणात खर्च होते. शहरातील तापमान पाहता जास्त प्रमाणात घाम येऊन थकवा येत असल्याने तसेच आई-बाबादेखील घराबाहेर जाण्यास मनाई करतात.- शुभम पाटील, विद्यार्थी उन्हाच्या झळा तीव्र असल्याने मैदानात मातीवर पाय भाजतात. शूज घालून खेळता येत नाही. शिवाय ऊन जास्त असल्याने आम्ही सावलीत खेळतो.- प्राप्ती म्हात्रे, विद्यार्थी

टॅग्स :Raigadरायगड