शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Raigad: तीन आमदारांच्या पेचामुळे आजपर्यंत मंत्रिपदापासून दूर, आमदार भरत गोगावले यांची खंत

By राजेश भोस्तेकर | Updated: August 16, 2023 22:42 IST

Bharat Gogawle: छत्रपती शिवाजी महाराज यांनी मावळ्यांच्या साथीने स्वराज्याची स्थापना केली. त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे हे आमच्या जीवावर मुख्यमंत्री झाले आहेत. असे मत शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी केले आहे.

- राजेश भोस्तेकर अलिबाग - छत्रपती शिवाजी महाराज यांनी मावळ्यांच्या साथीने स्वराज्याची स्थापना केली. त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे हे आमच्या जीवावर मुख्यमंत्री झाले आहेत. असे मत शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी केले आहे. एकाने पत्नी आत्महत्या करेल, दुसऱ्याने राजीनामा देतो तर तिसऱ्याने नारायण राणे संपवतील असे आमदार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गळ घातली. एकनाथ शिंदे हे पेचात पडल्याने त्यांना मंत्रिपद द्या असे सांगून आज पर्यंत मंत्रिपदापासून दूर राहिल्याची खंत आमदार भरत गोगावले यांनी बोलून दाखवली. शिवसैनिक, पदाधिकारी यांनी रात्री फोन बंद करून ठेवू नका असा सल्लाही गोगावले यांनी दिला आहे.

अलिबाग तालुक्यातील खानाव येथील काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत गोंधळी यांनी बुधवारी १६ ऑगस्ट रोजी आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. यावेळी अनेक सरपंच, इतर राजकीय पक्षातील पदाधिकारी यांनी शिंदे गटात प्रवेश केला. भरत गोगावले यांनी यावेळी सभेला संबोधिताना आपली खंत व्यक्त केली. तसेच राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती उपस्थितांना दिली. जनतेची सेवा करा, रात्री अपरात्री कोणाचा फोन आल्यास टाळू नका असा मोलाचा सल्लाही आमदार भरत गोगावले यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.'

अनंत गोंधळी आपण अमावस्या दिवशी पक्षात प्रवेश केला असून कोणावर अमावस्या उलटणार असा मिश्किल टोलाही विरोधकांना गोगावले यांनी मारला. मंत्री पदापासून दूर का राहिलो याबाबत ही गोगावले यांनी स्पष्टीकरण दिले. पहिल्या यादीत माझे नाव होते. मात्र तीन आमदार यांनी आपली समस्या मुख्यमंत्री याना सांगितली. एकाने मंत्रिपद न मिळाल्यास पत्नी आत्महत्या करेल, तर दुसऱ्याने मी राजीनामा देतो असे सांगितले. तर तिसऱ्याने मला मंत्रिपद मिळाले नाही तर नारायण राणे संपवतील असे सांगितले. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समोर पेच निर्माण झाल्याने अखेर मी त्यांना मंत्री करा असे सांगून बाजूला झालो. मात्र त्याबाबत मला बोलणी खावी लागत असल्याची खंत भरत गोगावले यांनी भाषणातून बोलून दाखवली. 

रायगड जिल्ह्यातून अनेक दिग्गज पुढील काळात शिवसेनेत येत आहेत. अलिबाग तालुक्यातील ६२ ग्रामपंचायतींना विकास कामासाठी दीडशे कोटी दिले. आधीच्या आमदारांनी विकास कामे केली नाहीत. त्यामुळे आज शेकाप हा संपत चाललेला पक्ष आहे. आम्ही जनतेची सेवा करीत असल्याने लोक आमच्या सोबत आहेत. अनंत गोंधळी यांच्या पक्ष प्रवेशाने यापरिसरतील असलेला शेकाप ही संपत आला आहे. उसर येथील गेल, एच पी कंपनीत स्थानिकांना रोजगार मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही यावेळी आमदार महेंद्र दळवी यांनी भाषणातून दिली. उमटे धरणासाठी १४१ कोटी निधी मंजूर केला असून सांबर कुंड धरणासाठी २ हजार कोटी निधी मंजूर झाल्याचेही आमदार दळवी यांनी म्हटले आहे.

टॅग्स :RaigadरायगडShiv Senaशिवसेना