अलिबाग : रायगड जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांमध्ये कौटुंबिक हिंसाचाराच्या ९८६ घटनांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी ८६६ पीडितांचा संसार उभारण्याचे काम महिला व बाल विकास विभागाच्या सखी केंद्रामार्फत करण्यात आले आहे. त्यामुळे अन्यायग्रस्त महिला आणि मुलांसाठी सखी केंद्र हे आधारवड ठरले आहे.सध्या एकत्र कुटुंब पद्धती लोप पावत आहे. पूर्वी कुटुंबामध्ये एकच प्रमुख व्यक्ती असायची आणि त्याच व्यक्तीचा अंमल घरावर असायचा. सुख-दु:खात हीच व्यक्ती कुटुंबाच्या पुढे असायची. त्याचप्रमाणे सर्वच एकत्र राहत असल्याने त्यांच्यामध्ये आनंद भरभरून वाहत होता. याच व्यक्तीचा कुटुंबावर चांगलाच धाक होता. प्रमुख व्यक्ती कुटुंबातील सदस्यांवर तेवढेच प्रेमही करायची. सध्या एकत्र कुटुंब पद्धतीत बांधून राहणे आजच्या पिढीला आवडत नाही, त्यामुळे ते आता स्वतंत्र राहत आहेत. स्वातंत्र्य असल्याने काही कुटुंबामध्ये स्वैराचारही चांगला फोफावला. त्यामुळे नवरा-बायकोच्या आयुष्यात कलह निर्माण होऊ लागला. त्यामुळे त्यांचे संसार तुटण्याची वेळ आली. आपण मातृसत्ताक असलो तरी आपल्याकडे पुरुषप्रधान संस्कृती अस्तित्वात आहे हे कोणीच नाकारू शकणार नाही. मात्र, अशा वेळी निराधार, अत्याचारग्रस्त पीडित महिलांसाठी महिला व बाल कल्याण विभागाने सुरू केलेले सखी केंद्र महिलांसाठी आधारवड ठरत आहे.जून २०१७ मध्ये अलिबाग येथे सखी या केंद्राची स्थापना करण्यात आली होती. तेव्हापासून आजपर्यंत तब्बल कौटुंबिक कलहाची ९८६ प्रकरण या सखी केंद्रात आली. त्यातील ८६६ प्रकरण यशस्वीपणे निकाली काढण्यात आली आहे. म्हणजेच ८६६ जणांचे संसार या सखी केंद्रामुळे आनंदित सुरू असल्याचे महिला व बाल विकास विभागाने सांगितले.>सध्या एकत्र कुटुंब पद्धतीत बांधून राहणे आजच्या पिढीला आवडत नाही, त्यामुळे ते आता स्वतंत्र राहत आहेत. स्वातंत्र्य असल्याने काही कुटुंबामध्ये स्वैराचारही चांगला फोफावला. त्यामुळे नवरा-बायकोच्या आयुष्यात कलह निर्माण होऊ लागला. त्यामुळे त्यांचे संसार तुटण्याची वेळ आली.कौटुंबिक कलहामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होण्याची वेळ आली होती. मात्र सखी केंद्राकडून करण्यात आलेल्या समुपदेशनामुळे अनेकांचे संसार सुरळीत सुरू आहेत.
रायगड जिल्ह्यात महिलांसाठी सखी केंद्र ठरतेय आधारवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 23:39 IST