शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

सीसीटीएनएस कार्यप्रणालीत राज्यात रायगड जिल्हा पोलीस दल तिसरे

By निखिल म्हात्रे | Updated: September 10, 2023 19:02 IST

लोकमत न्युज नेटवर्क  अलिबाग - सीसीटीएनएस कार्यप्रणाली मध्ये रायगड जिल्हयाने राज्यात पुन्हा एकदा आपली सरशी सिध्द केली आहे. सन ...

लोकमत न्युज नेटवर्क अलिबाग - सीसीटीएनएस कार्यप्रणाली मध्ये रायगड जिल्हयाने राज्यात पुन्हा एकदा आपली सरशी सिध्द केली आहे. सन २०२२ प्रमाणे सन २०२३ मध्ये आपले सातत्य कायम ठेवत रायगड पोलीस दलाने वार्षिक गुणांकनामध्ये राज्यातून तिसरे स्थान प्राप्त केले आहे. दरवर्षी सीसीटीएनएस कार्यप्रणालीचा जास्तित जास्त वापर, गुन्हे प्रकटीकरण व गुन्हे प्रतिबंध करणेसाठी सर्व घटकांकडुन मासिक कामगिरीचा आढावा घेण्यात येतो. त्यानुसार घटकांच्या कामगिरीचे मुल्यांकन करून उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या घटकांचा महाराष्ट्र पोलीस कर्तव्य मेळावामध्ये गौख करण्यात येतो.

रायगड जिल्हयाने सन २०२२ चे सातत्य कायम ठेवत सन २०२३ मध्ये सीसीटीएनएस कार्यप्रणालीच्या नावाप्रमाणे कर्तव्य पार पाडत जुलै महिना पर्यंत १ प्रथम, ४ व्दितीय व २ वेळा तृतीय क्रमांक प्राप्त करीत सीसीटीएनएस प्रणालीच्या वार्षिक गुणांकनात तिसऱ्या क्रमांकाच्या पारितोषीकावर आपले नाव कोरले.

शनिवारी राज्य राखीव पोलीस दल, गट क्रमांक २, रामटेकडी-पुणे येथे १८ या महाराष्ट्र पोलीस कर्तव्य मेळावा सन २०२३ च्या दिमाखदार समारोप सोहळया दरम्यान  पोलीस महासंचालक  रजनीश सेठ यांच्या हस्ते जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे,  व सीसीटीएनएस रायगड टिम यांना तृतीय क्रमांकाची ट्रॉफी देवून सन्मानित करण्यात आले.रायगड जिल्हयाने पोलीस ठाण्यात दाखल होणारे गुन्हे, अहवाल यांची सीसीटीएनएस मधील फॉर्मची तत्काळ नोंदणी, सिटीझन पोर्टल वरील प्राप्त तक्रारींची तत्काळ निर्गती, सीसीटीएनएस प्रणालीचा वापर करून करण्यात येणारे गुन्हे प्रकटीकरण, प्रतिबंधक कारवाई यामध्ये विशेष कामकाज करीत सदरचे यश प्राप्त केले आहे. पोलीस ठाण्यात अटक होणाऱ्या गुन्हेगारांची कुंडली जुळविण्यात सदर प्रणाली अत्यंत प्रभावी ठरत असुन रायगड जिल्हा पोलीस दलाची ही घोडदौड यापुढेही अशीच सुरु राहील असे प्रतिपादन अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी केले आहे.रायगड पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार यांच्या अपार मेहनतीचे हे यश आहे. यामध्ये सातत्य कायम ठेवत यापुढेही रायगड जिल्हा अग्रस्थानी ठेवण्याकरीता प्रयत्नशिल राहू असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक रायगड सोमनाथ घार्गे यांनी केले आहे.

टॅग्स :Policeपोलिस