शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

रायगड जिल्हा निसर्ग चक्रीवादळाच्या चक्रव्यूहात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2020 00:18 IST

तातडीची मदत जाहीर झाली. ुमात्र पैसा फेकून इथला माणूस उभा राहणार नाही, हे लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांना कसे कळत नाही. मदत दिली नाही, तरी कुणीही उत्तरदायी धरणार नाही, हे त्यांना माहीत आहे.

- आविष्कार देसाईनारळ आणि सुपारीच्या बागा जवळजवळ संपूर्णपणे झोपल्या आहेत. आता नारळ, सुपारीचा व्यापार करता येणार नाही. पुढील १०-१५ वर्षे बागा उभ्या राहणार नाहीत. पोटच्या मुलांसारखी जपलेली झाडे वादळाने जमीनदोस्त केली. आज बागायतदार कुटुंबीयांच्या डोळ्यात पाणी आहे. चौल, मुरुड, श्रीवर्धन परिसर भयाण झाला आहे. भरपाईच्या घोषणा झाल्या, दौरे, फोटोसेशन झाले. तातडीची मदत जाहीर झाली. ुमात्र पैसा फेकून इथला माणूस उभा राहणार नाही, हे लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांना कसे कळत नाही. मदत दिली नाही, तरी कुणीही उत्तरदायी धरणार नाही, हे त्यांना माहीत आहे.रायगड आणि एकंदरच कोकण किनारपट्टीत निसर्ग चक्रीवादळाने शेतकरी, बागायतदार, कारखानदार सगळेच कोलमडले आहेत. पुन्हा उभे कसे राहायचे ही मोठी चिंता येथील प्रत्येक नागरिकासमोर होती. रायगडमध्ये सध्या प्रशासकीय यंत्रणा केवळ मदतीच्या आकडेवारीची जुळवणी करून, आपल्या स्वामींसमोर सादर करून वाहवा मिळवत आहे. नुकसानीच्या पंचनाम्यांची आकडेवारी तयार करण्यात तत्परता आणि मदत पोच झाल्याचे ग्राफ रंगविण्यात धन्यता इतकेच उद्दिष्ट यंत्रणेसमोर आहे का? अशी शंका आल्याशिवाय राहत नाही. रायगडमधला माणूस या सर्वांपासून आलिप्त आहे, पुन्हा सर्वकाही ठीक करण्याचा एकाकी प्रयत्न करीत आहे. ना सामाजिक क्षेत्र, ना उद्योग क्षेत्र, ना सरकारी क्षेत्र सगळी दु:ख गिळून रायगडकर चालू लागलाय, पण त्याला माहीत नाही, पुढे किती अंतर असेच चालायचे आहे.सोबत सगळेच दिसतात. राजकीय नेते, प्रशासनातील अधिकारी, धार्मिक संस्था, पण कुणीही आपलं नाही, ही खूणगाठ रायगडमधल्या जनतेने वादळ आले आणि वाताहात डोळ्यांनी पाहताना, अनुभवतानाच बांधली होती. महाराष्ट्रात इतरत्र नैसर्गिक आपत्ती आल्या. पूर आले, भूकंप झाले. रायगडमधील मासेमारी करणारी, शेतात राबणारी, नारळी-पोफळीच्या बागांमध्ये कष्ट करणारी आणि औद्योगिक क्षेत्रात काम करणारी जनता धावून गेली होती. रायगडमधून ट्रक भरून कपडे, धान्य अगदी निष्कामपणे पश्चिम महाराष्ट्रात, मराठवाड्यात इतकंच नव्हे, तर केरळात धाडणारा रायगडच्या मातीतलाच होता. मदत नको, पण आपुलकीचा एक शब्दही बाहेरच्या जगाकडून रायगडपर्यंत पोहोचला नाही. अर्थात, त्याची खंत रायगडकरांना नाही. त्याने फक्त अवलोकन केले की, हे असे असते. ही अनास्था इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी, सनदी सेवा परीक्षांमध्ये चमकल्याचा अभिमान बाळगणाºया तहसीलदार, प्रांत, जिल्हाधिकारी आदी अधिकाऱ्यांनी घेतलीय की काय, अशी शंका वादळाने उद्ध्वस्त झालेला माणूस घेत आहे. त्यांची ही अनास्था आहे की, परिस्थितीच समजली नाही, हे अज्ञान आहे, हे भलेमोठे कोडे इथल्या स्वाभिमानी माणसाला पडले आहे.रायगडमधील मच्छी, चिकन, मटणविक्रेते निसर्ग चक्रीवादळाने उद्ध्वस्त झालेले आहेत. त्यांच्या विक्रीला कालमर्यादा आखून दिली आहे. ग्राहक कमी झाले आहेत. वादळात किनाºयावर सुरक्षित लावलेल्या होड्याही फुटून उद्ध्वस्त झाल्या आहेत.एक अभ्यासू राजकीय नेता म्हणून ओळखले जाणारे शरद पवार यांना ही परिस्थिती नक्कीच समजली आहे. लातूर भूकंप असो की, गुजरातचा शरद पवार यांना आपत्तीकाल कसा हाताळावा, याचे प्रगाढ ज्ञान आहे. त्यांनी दौरा केला. त्यांनीच उभ्या केलेल्या फळबागा उद्ध्वस्त झाल्याचे पाहिले. नारळ-सुपारी नामशेष होईल हे त्यांनी ओळखले. या सर्वांचा संबंध पर्यटन व्यवसायाशी आहे, हे जाणणारा आणि त्याविषयी आस्थेवाईकपणे विचारणारा हा चक्रीवादळपश्चात श्रीवर्धनला भेट देणारा पहिलाच नेता. पवार यांनी नुकसान पाच हजार कोटी रुपयांचं झालं हे सांगितलं, पण त्यांना एक चांगलंच माहीत होतं, ते म्हणजे नुकसान परिणामकारकपणे केंद्रासमोर मांडता येण्यास अडचणी येणार. पवार यांनी सुचविले की, मांडणी नीट करा. रायगडबाबत ही मांडणी चुकली आहे. नुकसानाची आकडेवारी आणि त्याचे मानसिक आयाम वैज्ञानिक पद्धतीने मांडण्यात आलेले नाहीत. तलाठ्यांकडे देण्यापेक्षा टाटा सामाजिक विज्ञान संस्था किंवा अन्य विश्वासू संस्थांकडे हे काम पालकमंत्र्यांनी आणि जिल्हाधिकाºयांनी दिले असते, तर वेगळेच चित्र दिसले असते. २४ तास लोकांमध्ये मिरवणारे प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी अभ्यासात कमी पडले. त्यांनी मंत्र्यांकडे काही शिफारशी केल्याचा रेकॉर्ड चक्रीवादळपश्चात मदत कार्यात आढळला नाही. ३७४ कोटी राज्य सरकारने दिले, पण वाटपात अडचणी येत आहेत. त्यात अनेक त्रुटी आहेत. त्याच्या सुरस कथाही बाहेर येत आहेत. जनतेच्या परीक्षेत प्रशासन नापास झाल्याचे विदारक वास्तव दिसत आहे.सव्वा लाख घरांची पडझड झाली, १५ हजार विजेचे खांब पडले. पाऊस सुरू झाला, तरी प्रशासनाकडे संवेदनेचा, अभ्यासाचा आणि कृतिशीलतेचा ओलावा जागलाच नाही.औद्योगिकीकरणाने रायगडला तारले. चक्रीवादळाने उद्योगांवर काहीही गंडांतर आलेले नाही. ते कोरोनाने आलेले आहे. श्रमिक जिल्ह्यातून अस्तंगत झाले. श्रमिक आले की, त्यांना अन्न पुरविण्याचा व्यवसाय असो की, निवासस्थाने उपलब्ध करून देण्याचा व्यवसाय, वादळामुळे रायगडवासीयांची ही व्यावसायिकता कोलमडली. त्यांना स्वत:लाच सावरणे ही प्राथमिकता होती आणि आजही आहे. यापुढे ज्येष्ठ स्वातंत्र्य योद्धा आणि गांधीजींचे अनुयायी डॉ. जी. जी. पारिख म्हणतात, त्याप्रमाणे ग्रामोद्योगांकडे रायगडकरांना लक्ष द्यावे लागणार आहे. औद्योगिकीकरणाचे ठीक आहे, पण भारताच्या स्थानिक परिस्थितीला अनुसरून व्यवसाय उभे केले पाहिजेत.

टॅग्स :Raigadरायगड