शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

रायगडात दरड काेसळण्याचे सत्र सुरूच; पोलादपूर, श्रीवर्धनमध्ये दोन ठिकाणी रस्त्यावर दगडांचा खच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2023 06:39 IST

प्रशासनाने तत्काळ दखल घेत दरड हटवून वाहतूक पूर्ववत केली आहे. 

पोलादपूर/ दिघी : गुरुवारपासून पावसाने जाेर पकडला असून शुक्रवारी दिवसभर संततधार सुरूच होती. यामुळे रायगड जिल्ह्यात दोन ठिकाणी रस्त्यावर दरड पडल्याच्या घटना घडल्या. पोलादपूर- महाबळेश्वर राज्य मार्गावर कुंभळवणे गावाजवळ मातीचा ओसरा खाली आला तर तर श्रीवर्धन तालुक्यात वडवली- दिघी मार्गावर कुडगाव पाण्याच्या टाकीजवळ दरड रस्त्यावर आली. प्रशासनाने तत्काळ दखल घेत दरड हटवून वाहतूक पूर्ववत केली आहे. 

पोलादपूर  तालुक्यात पुन्हा पाऊस सक्रिय झाला असून, वेधशाळेने दिलेल्या इशाऱ्यानंतर गेल्या २४ तासांत ४१ मिलिमीटर पाऊस पडला. शुक्रवारी सकाळपासून मुसळधार सुरू आहे. पोलादपूर- महाबळेश्वर राज्यमार्गावर कुंभळवणे गावाच्या जवळ मातीचा ओसरा खाली आल्याची घटना घडली. पायटा गावाच्या आसपास एक झाड वाकल्याने रस्त्याच्या बाजूला झुकले. दरड खाली आल्याने, काही तास वाहतूक खोळंबली होती. 

दरड केली बाजूला सार्वजनिक बांधकाम उपविभागाने जेसीबीने माती बाजूला करण्याचे काम सुरू केले. दरड बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. दिघी- पुणे महामार्गाच्या अर्धवट कामांमुळे वडवली- दिघी मार्गावर कुडगाव पाण्याच्या टाकीजवळ दुपारी अचानक दरड कोसळली. मुसळधार पाऊस व त्यात पोखरलेले डोंगर त्यामुळे मातीच्या ढिगाऱ्यासह मोठा दगड रस्त्यावर आला. त्यावेळी येथून कोणतेच वाहन जात नसल्याने अनुचित प्रकार टळला.  

टॅग्स :Raigadरायगड