शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

‘खेलो इंडिया’त रायगडचे स्पर्धक चमकावेत- सुनील तटकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 23:03 IST

रोह्यात दोन दिवसीय क्रीडा-सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन

धाटाव : रोहा तालुक्यामध्ये विकास करत असताना तालुका क्रीडा संकुल उभे केले. ‘खेलो इंडिया’तील स्पर्धांमध्ये यापुढे रायगड जिल्ह्यातील विशेषत: रोह्यातील खेळाडू सहभागी होतील, यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. रोह्यातील क्रीडा संकुलातील जलतरण तलावासाठी ८.५ कोटींचा प्रस्ताव राज्याकडे आला आहे. आगामी केंद्रीय अधिवेशनात भारत सरकारच्या ‘खेलो इंडिया’ कार्यक्रमात आॅलिम्पिक दर्जाच्या जलतरण तलावाला १०० टक्के मान्यता मिळविली जाईल, असे अभिवचन खासदार सुनील तटकरे यांनी दिले.रोहा (धाटाव) येथील क्रीडा संकुलाच्या प्रांगणावर २०२० वर्षामध्ये पंचायत समिती, रोहा यांच्या वतीने कर्मचारी वर्गासाठी आयोजित क्रीडा, सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर पंचायत समितीच्या सभापती गुलाब वाघमारे, उपसभापती रामचंद्र सपकाळ, मधुकर पाटील, विजय मोरे, विनोद पाशिलकर, अनिल भगत, रोहिदास पाशिलकर, माजी सभापती राजश्री पोकळे, विनायक चितळकर, सदस्य संजय भोसले, बिलाल कुरेशी, सिद्धी राजिवले, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, साहाय्यक गटविकास अधिकारी पंडित राठोड, बालविकास अधिकारी शरयू भोसले, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अभय ससाने, पाणीपुरवठा अधिकारी प्रशांत म्हात्रे, यशवंत रटाटे उपस्थित होते.तटकरे म्हणाले, धकाधकीच्या जीवनशैलीमुळे शारीरिक व्याधी बळावल्या आहेत. क्रीडा स्पर्धांमुळे शारीरिक तंदुरुस्ती टिकवण्यात आपण सक्षम राहू शकतो. यंदा राज्याला ६० वर्षे पूर्ण होत आहेत. अशा स्पर्धा भरवायच्या असतील तर जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्याचा नियम राज्य सरकारने करावा, अशी भूमिका घेतली जाईल. महसूल विभाग अशा विभागीय स्पर्धा घेत असेल तर ग्रामविकास खात्यानेसुद्धा स्पर्धा भरविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी सुचविले.क्रीडा व सांस्कृतिक समितीचे अध्यक्ष नारायण गायकर यांनी, सर्व कर्मचारी शासन निर्णयाने काम करीत असताना ताणतणावातून मुक्त होण्यासाठी व आरोग्य सुदृढ राहण्यासाठी स्पर्धा घेतल्या असल्याचे नमूद केले.रोहा तालुका क्रीडा संकुलाच्या प्रांगणात दोन दिवस क्रिकेट, कबड्डी, लंगडी व खो-खो, हॉलीबॉल आदी स्पर्धा होणार आहेत.

टॅग्स :sunil tatkareसुनील तटकरे