शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती शिवरायांच्या जयघोषाने दुमदुमला रायगड; तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक दिन जल्लोषात साजरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2024 05:50 IST

किल्ले रायगडवरील मेघडंबरी फुलांच्या माळांनी सजवण्यात आली होती. गडावर गेले दोन दिवस विविध धार्मिक विधी, पूजापाठ असे मंगलमय वातावरण होते.

लोकमत न्यूज नेटवर्क , महाड : सनई चौघड्यांचे मंगलमय सूर, ढोल-ताशांचा गजर, छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष अशा अलोट उत्साही वातावरणात आणि हजारो शिवप्रेमींच्या उपस्थितीत रायगडावर गुरुवारी तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक दिन जल्लोषात साजरा करण्यात आला. शिवरायांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून नंतर प्रतिमेवर सप्तसिंधूंच्या पाण्याने जलाभिषेक करण्यात आला. शिवराज्याभिषेक वर्धापन दिन हा शिवराज्याभिषेक दिनोत्सव समिती, कोकणकडा मित्र मंडळ आणि रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने साजरा करण्यात येतो. यावर्षी सोहळ्याचे भव्य आयोजन शासनाच्या सहकार्याने करण्यात आले होते. यावेळी किल्ले रायगडवरील मेघडंबरी फुलांच्या माळांनी सजवण्यात आली होती. गडावर गेले दोन दिवस विविध धार्मिक विधी, पूजापाठ असे मंगलमय वातावरण होते. गडावरील विविध देवी-देवतांची विधिवत पूजा झाल्यानंतर धर्मशाळा ते राजदरबार अशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली.

पालखी राजदरबारात दाखल होताच प्रत्यक्ष शिवराज्याभिषेक दिन कार्यक्रमाला सुरुवात झाली. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत, सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार, खा. सुनील तटकरे, आ. भरत  गोगावले आदी मान्यवर उपस्थित होते. 

महाराष्ट्र हे शिवाजी महाराजांच्या विचारांनी वाटचाल करणारे राज्य : मुख्यमंत्रीछत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यातून सुराज्य निर्माण केले. शिवरायांची ही संकल्पना प्रत्यक्षात आणून आताही सुराज्य निर्माण करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य हे शिवरायांच्या विचारांवर वाटचाल करत आहे, असे प्रतिपादन शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. महाराजांचे कर्तृत्व आणि त्याग मोठा आहे. त्यामुळे शिवराज्याभिषेक दिन कितीही दिवस साजरा केला तरी तो कमी आहे, असेही ते म्हणालेे. 

सुवर्ण नाण्यांचा अभिषेक  किल्ले रायगडावर मंगलमय वातावरणात सकाळी ६ वाजता शिवराज्याभिषेकाच्या धार्मिक विधींना सुरुवात झाली. मंत्रघोषात छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा सिंहासनाधिष्ठित करण्यात आली. सिंहासनावर आरूढ झालेल्या शिवाजी महाराजांच्या प्रतिमेवर सुवर्ण नाण्यांचा अभिषेक करण्यात आला. हा क्षण उपस्थित शिवप्रेमींची उत्कंठा शिगेला नेणारा होता. 

व्हीआयपींसाठी शिवप्रेमींचे हालसोहळ्यासाठी हजारो शिवभक्त रायगडावर दाखल झाले होते. मात्र, या सोहळ्यासाठी अनेक ‘व्हीआयपी’ मंडळी उपस्थित होती. त्यामुळे रायगड रोपवे काही काळ सामान्य शिवप्रेमींसाठी बंद ठेवला होता. त्याचप्रमाणे सुरक्षेच्या कारणास्तव तीन किलोमीटर अंतरावरच वाहने थांबवण्यात आली होती. 

टॅग्स :RaigadरायगडShivrajyabhishekशिवराज्याभिषेक