शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

रायगडमध्ये घुमला ‘गणपती बाप्पा मोरया’चा गजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2019 00:03 IST

रायगड जिल्ह्यात विविध ठिकाणी एकूण ६५० साखरचौथ गणेशमूर्तींची स्थापना करण्यात आली आहे.

अलिबाग : रायगड जिल्ह्यात विविध ठिकाणी एकूण ६५० साखरचौथ गणेशमूर्तींची स्थापना करण्यात आली आहे. त्यामध्ये सार्वजनिक २९२ आणि खासगी ३५८ गणेशमूर्तींचा समावेश आहे. संततधार पाऊस सुरू असूनही गणेशभक्तांचा उत्साह कायम असल्याचे दिसून आले.गणेश चतुर्थीनंतर येणाऱ्या पहिल्या संकष्टीच्या दिवशी साखरचौथ गणरायाचा उत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. गणेशमूर्ती कारखान्यात काम करणारे मूर्तिकार हे गणेश चतुर्थीच्या दिवशी कारखान्यातच व्यस्त असल्याने त्यांना हा सण साजरा करता येत नाही. त्यांनाही सण साजरा करता यावा यासाठी गणेश चतुर्थीनंतर येणाºया पहिल्या संकष्टीच्या दिवशी साखरचौथ गणरायाचा उत्सव ते जल्लोषात साजरा करतात. मात्र, आता या उत्सवाचे स्वरूप बदलले आहे. सर्रास हा सण साजरा केला जात आहे. अंगारकी संकष्टीच्या मंगळवारी शहर व ग्रामीण भागात सार्वजनिक मंडळे व घरगुती साखरचौथ बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली आहे.>सामाजिक बांधिलकी जपणारा गडब येथील मंगलमूर्तीचा गणेशोत्सववडखळ : सर्व ग्रामस्थांच्या एकजूटीतून श्री गणेशावरील भक्ती व सामाजिक बांधिलकी जपणारा, पेणमधील गडब-जांभेळा येथील मरुदेवी मंदिराच्या प्रांगणात मंगलमूर्ती मित्रमंडळाच्या विद्यमाने सतत सात वर्षे साखरचौथ गणेश उत्सव साजरा केला जात आहे. या पुढेही हा उत्सव साजरा करणार असल्याचा विश्वास मंडळाचे सदस्य व्यक्त करीत आहेत. आजूबाजूच्या गावात साखरचौथ गणेशोत्सव साजरा होत असताना गावातही हा उत्सव साजरा व्हावा, यासाठी येथील तरुणांनी एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करण्याची संकल्पना आखली. त्याला ग्रामस्थांनी साथ दिली.>नांदगाव हायस्कूल येथे ‘पंचक्रोशीचा राजा’ विराजमानमुरुड : नांदगाव हायस्कूल येथे पंचक्रोशीचा राजा विराजमान झाला आहे. साखरचौथ गणपतीनिमित्ताने येथे दरवर्षी पंचक्रोशीचा राजा या नावाने गणपतीचे आगमन होत असते. या वेळी या गणपती सजावटमध्ये इस्रोच्या माध्यमातून चांद्रयान-२ च्या मोहिमेतील माहिती उत्कृष्ट सजावटीद्वारे मुलांना देण्यात आली आहे. या सजावटीमध्ये जीएसएलव्ही-३ ची प्रतिकृती व प्रग्यान रोव्हरची प्रतिकृती व तारांगणची निर्मिती करण्यात आली होती. देखावा व सजावट प्रतीक पेडणेकर, विजय बनाटे व अमर दरने यांनी उत्कृष्टरीत्या केली.