शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

Raigad: रायगडमधील ताजपूर गावच्या पाण्याच्या टाकीवर कोसळली दरड, गावचा पाणी पुरवठा बंद

By राजेश भोस्तेकर | Updated: July 28, 2023 15:39 IST

Raigad: लिबाग तालुक्यातील वाघजाई येथे गुरुवारी छोटी दरड पडल्याची घटना ताजी असताना शुक्रवारी पहाटे साडे चार वाजण्याच्या सुमारास रामराज विभागातील ताजपुर गावातील पाण्याची टाकी आणि विहीर परिसरात दरड पडली आहे.

- राजेश भोस्तेकरअलिबाग - रायगड जिल्ह्यात आठवडाभर मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. मुसळधार पावसाने अनेक डोंगर भागात दरड पडण्याच्या घटना घडत आहेत. अलिबाग तालुक्यातील वाघजाई येथे गुरुवारी छोटी दरड पडल्याची घटना ताजी असताना शुक्रवारी पहाटे साडे चार वाजण्याच्या सुमारास रामराज विभागातील ताजपुर गावातील पाण्याची टाकी आणि विहीर परिसरात दरड पडली आहे. त्यामुळे परिसरात मातीचा ढिगारा साचल्याने गावाचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सुदैवाने यात कोणासही दुखापत झालेली नाही आहे. अलिबाग महसूल विभागाने घटनास्थळी जाऊन पाहणी करून नागरिकांना पावसाचा अंदाज घेऊन सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याच्या सूचना केल्या आहेत. पाणी प्रश्न निर्माण झाल्याने टँकर द्वारे पाणी पुरवठा करण्याच्या सूचना तहसीलदार विक्रम पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

अलिबाग तालुक्यात गेल्या आठवडाभर मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. डोंगर भागात राहणाऱ्या नागरिकांना दरड कोसळण्याची शक्यता असल्याने सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. इर्शाळवाडी दरड दुर्घटना झाल्यापासून जिल्ह्यात कुठे ना कुठे दरड पडण्याच्या घटना घडत आहेत. अलिबागमध्ये दोन दिवसात लहान मोठ्या दरड पडण्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे डोंगर भागात राहणाऱ्या नागरिक हे दरडीच्या भीतीच्या सावटाखाली आहेत.

अलिबाग तालुक्यातील रामराज विभागात ताजपुरी गाव हे डोंगर भागात वसलेले आहे. याठिकाणी दोनशे घराची वस्ती आहे. गावाला पाणी पुरवठा करणारी पाण्याची टाकी आणि विहित ही वस्तीच्या खालच्या भागात डोंगर उतारावर बांधण्यात आलेली आहे. अलिबागमध्ये सतत पाऊस पडत असल्याने डोंगरातून उतारावरून पाण्याचा निचरा होत आहे. शुक्रवारी पहाटे साडे चार वाजण्याच्या सुमारास मुसळधार पडत असलेल्या पावसाने टाकी आणि विहीर परिसरातील वरील मातीचा ढिगारा कोसळला. डोंगराची पडलेली मातीची दरड ही पाण्याची टाकी आणि विहीर परिसरात कोसळली आहे. त्यामुळे या परिसरात ढोपरभर मातीचा ढिगारा साचला आहे. दरडी मुळे टाकीचे नुकसान झाले असून त्यातून पाणी वाहत होते.

दरडी कोसळण्याची माहिती कळताच स्थानिक ग्रामस्थ, अलिबाग तहसीलदार विक्रम पाटील, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, पोलीस यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दरड कोसळल्याने पाणी पुरवठा टाकी ही मातीत गाडली गेली आहे. त्यामुळे पाण्याचे गावात जाणारे कनेक्शन बंद करण्यात आलेले आहे. गावाच्या पाण्यासाठी टँकर द्वारे पाणी पुरवठा करण्याच्या सूचना तहसीलदार यांनी संबंधितांना दिल्या आहेत. दरड ही खालच्या बाजूला कोसळली असल्याने वरच्या गावाला धोका नसला तरी नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याच्या सूचना प्रशासनाकडून दिल्या आहेत.

टॅग्स :Raigadरायगडlandslidesभूस्खलन