शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Raigad: 81 मतदान केंद्रांवर 54 हजार 208 मतदार बजाविणार मतदानाचा हक्क

By निखिल म्हात्रे | Updated: June 25, 2024 20:13 IST

Vidhan Parishad Election 2024: कोकण पदविधरसाठी रायगड जिल्ह्यातील 81 मतदान केंद्रावर 54 हजार 208 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यासाठी निवडणूक प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे. मतदान केंद्रावर जिल्हा प्रशासनाचे 486 अधिकारी व कर्मचारी कर्तव्य बजावणार आहेत.

- निखिल म्हात्रे अलिबाग - कोकण पदविधरसाठी रायगड जिल्ह्यातील 81 मतदान केंद्रावर 54 हजार 208 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यासाठी निवडणूक प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे. मतदान केंद्रावर जिल्हा प्रशासनाचे 486 अधिकारी व कर्मचारी कर्तव्य बजावणार आहेत. आज होणाऱ्या मतदान प्रक्रियेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनही सज्ज झाले आहे.

नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर कोकण पदविधर निवडणूकीचे बिगूल वाजले होते. मागील 20 दिवसांपासून निवडणूकीची रणधुमाळी सुरु होती त्याला आता पुर्ण विराम मिळाला आहे. आज पार पडणाऱ्या निवडणूकीसाठी जिल्ह्यात 81 मतदान केंद्रावर 81 मतदान अधिकारी, 243 सहाय्यक मतदान अधिकारी, 81 शिपाई, 81 पोलिस कर्मचारी असे एकूण 486 अधिकारी व कर्मचारी आपले कर्तव्य पार पाडणार आहेत.

कोकण पदवीधर मतदारसंघातील रायगड जिल्हयात एकूण 81 मतदान केंद्रे आहेत. सर्वाधिक मतदान केंद्र आणि मतदार हे पनवेल विधानसभा मतदार संघात आहेत. 1 जानेवारी 2024 पर्यंत पनवेल विधानसभा मतदार संघात 9 मतदान केंद्रांसाठी 20 हजार 71, उरण  विधानसभा मतदार संघात दोन मतदान केंद्रांसाठी 3 हजार 825, कर्जत विधानसभा मतदार संघात तीन मतदान केंद्रांसाठी 6 हजार 646, पेण विधानसभा मतदार संघात 6 हजार 704, अलिबाग विधानसभा मतदार संघात 5 हजार 291, श्रीवर्धन विधानसभा मतदार संघात 7 हजार 737, महाड विधानसभा मतदार संघात 3 हजार 934 अशा एकूण 54 हजार 208 पदवीधर मतदारांची नोंदणी झाली आहे. यात पुरुष मतदार 30 हजार 843, महिला मतदार 23 हजार 356 आणि तृतीय पंथी पदवीधर मतदार 9 आहेत. सर्वाधिक मतदार पनवेल तालुक्यात असून त्यांची संख्या 20 हजार 71 इतकी आहे. 

पोलिसांचा चोख बंदोबस्त निवडणुकीत कुठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 81 मतदान केंद्रांवर 81 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तसेच निवडणूक आयोगामार्फत मतदानाची पूर्ण तयारी करण्यात आली आहे.

टॅग्स :Vidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूक 2024Votingमतदान