शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बाटलीबंद पाण्याच्या शुद्धतेवर प्रश्नचिन्ह, शु्द्ध पाण्याच्या नावाने फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 06:41 IST

पाण्याच्या टंचाईच्या झळा सर्वसामान्य नागरिकांसोबतच मध्यमवर्गीय नागरिकांना देखील सतावत आहे. शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातील समारंभ, लग्न आदी कार्यात मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याचे जार वापरले जात आहेत.

- मयूर तांबडेपनवेल - पाण्याच्या टंचाईच्या झळा सर्वसामान्य नागरिकांसोबतच मध्यमवर्गीय नागरिकांना देखील सतावत आहे. शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातील समारंभ, लग्न आदी कार्यात मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याचे जार वापरले जात आहेत. कॅनविक्रे ते मिनरल वॉटर असल्याच्या नावावर केवळ थंड पाणी ग्राहकांना पुरवीत आहेत. कॅनमधून व बंद बॉटलमधून पाणी विकणाऱ्या विक्रेत्यांची तपासणी होऊन फसवणूक करणाºयांवर कारवाईची गरज आहे.तालुक्यातील ग्रामीण भागात तसेच शहरात नागरिकांना मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी टँकरच्या पाण्यावर आपली तहान भागवावी लागत आहे. तर शहरी भागात वेगवेगळ्या प्रकारचे पाणी येत असल्याने आजारी पडण्याची शक्यता लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील नागरिक बाटलीबंद तसेच पाण्याचे जार पिण्याच्या पाण्यासाठी सर्रास वापरत आहेत. जारचे पाणी दीड रु पया लिटर तर बाटलीतील पाणी पंधरा ते वीस रु पये लिटर या दराने नागरिकांना विकत घ्यावे लागत आहे. पनवेल परिसरात सुमारे पाच ते दहा लाख रु पये खर्च करून कूपनलिकेद्वारे पाणी घेऊन मशिनच्या साहाय्याने पाणी स्वच्छ करून विकण्याचा व्यवसाय जोरात सुरू आहे. सध्या लग्नसमारंभ मोठ्या प्रमाणात होत असून, प्रत्येक ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या कॅन दिसून येतात. परंतु, हे पाणी खरोखरच शुद्ध आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.युव्ही स्टरीलायझेशन, सूक्ष्म गाळणी व ओझोनायझेशन आदी प्रक्रि या करूनच पाणी कॅनद्वारे नागरिकांना मिळणे अपेक्षित आहे. परंतु, मिनरल वॉटरच्या नावाखाली थंड पाण्याचा गोरखधंदा सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. पनवेल परिसरात पाण्याचे दहा ते पंधरा कारखाने आहेत. त्यावर अन्न व औषधी प्रशासन, आरोग्य विभाग तसेच वैधमापन शास्त्र विभागाचे कुठलेही नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे. अन्न व औषधी प्रशासन तसेच आरोग्य विभागाच्या सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेच्या माध्यमाद्वारे कॅनमधील पाण्याची चाचणी व शहानिशा होत नसल्याची तक्र ार करण्यात येत आहे. मात्र, प्रशासन याची दखल घेत नसल्याचा आरोप होत आहे.पनवेल परिसरात अनेक अनधिकृत बाटलीबंद पाण्याचे वितरक असल्याने अशा वितरकांवर कारवाईची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. शहरातील छोट्या-मोठ्या कार्यालयापासून अनेक घरांपर्यंतही या जारच्या पाण्याचा पुरवठा होऊ लागला आहे. बाटलीबंद पाणी विकण्यासाठी ब्युरो आॅफ इंडियन स्टॅण्डर्डची परवानगी असणे आवश्यक आहे. तसेच अन्न व औषध प्रशासनाची परवानगी असणेही गरजेचे आहे, तरच या परवानग्या असलेला वितरकच बाटलीबंद पाण्याची विक्री करू शकतो. नागरिकांना अशुद्ध पाणी विकून त्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक करणाºयाविरोधात अन्न, औषध प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारण्याची मागणी केली जात आहे.बाटलीबंद पाण्याच्या कंपन्यांचे सॅम्प्लिंग केले जाते. पाण्यासंदर्भात तक्र ारी आलेल्या नाहीत. नागरिकांची तक्र ार आली की आम्ही पाण्याचे सॅम्प्लिंग करून कारवाई करतो.- डी. संगत,सहायक आयुक्त,अन्न, औषध प्रशासन विभाग,पेण 

टॅग्स :Waterपाणीnewsबातम्या