शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

आदर्श ग्राम योजनेच्या निधीबाबत प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 02:01 IST

रायगड जिल्ह्यातील तीन गावे सांसद आदर्श ग्राम योजनेत समाविष्ट करण्यात आली आहेत

आविष्कार देसाईअलिबाग : रायगड जिल्ह्यातील तीन गावे सांसद आदर्श ग्राम योजनेत समाविष्ट करण्यात आली आहेत. १७२ विकासकामांपैकी १२१ कामे पूर्ण करण्यात संबंधित यंत्रणांना यश आले आहे. यात मावळचे खासदार श्रीरंग बारणे वगळता खासदार अनंत गीते आणि खासदार किरीट सोमय्या यांनी खासदार निधीचा एक रुपयाही खर्च केलेला नाही. बहुतांश कामे सीएसआर फंडातून करण्यात आली आहेत. विविध योजनांसाठी खर्च करण्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या निधीचा एकत्रित हिशोब एकाही प्रशासकीय यंत्रणेकडे नसल्याने सांसद आदर्श ग्राम योजनेतील झालेल्या कामांबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील सांसद आदर्श ग्राम योजना आहे. त्यामुळे ती केंद्र सरकार तसेच त्या-त्या राज्य सरकारांसाठीही तितकीच महत्त्वाची योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक खासदारांनी पहिल्या टप्प्यात आपापल्या मतदार संघातील किमान एका गावाचा विकास करायचा आहे. यासाठी त्यांनी त्यांना दरवर्षी उपलब्ध होणाऱ्या पाच कोटी खासदार निधीचा विनियोग करण्याला सरकारने कोणतीच हरकत घेतलेली नाही. निधीची कमतरता पडू नये यासाठी कंपन्यांच्या सीएसआर फंडातून तो घेण्याची मुभा सरकारनेच परिपत्रक काढून दिली आहे.रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील चिंचोटी ग्रामपंचायत भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांनी विकासासाठी दत्तक घेतली आहे. त्याचप्रमाणे शिवसेनेचे खासदार तथा केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर गावाचा विकास करण्याचे ठरवले, तर शिवसेनेचेच मावळ मतदार संघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील बांधपाडा या गावाचा समावेश केला आहे. खासदार बारणे यांनी आपल्या खासदार निधीतील तब्बल ४५ लाख रुपये या गावाच्या विकासासाठी दिले आहेत, मात्र खासदार अनंत गीते आणि खासदार किरीट सोमय्या यांनी त्यांच्या खासदार निधीतील एक रुपयाही खर्च केलेला नाही.गावांचा विकास करताना बहुतांश सीएसआर फंडातूनच कामे जास्त झाल्याचे बोलले जाते. उर्वरित कामे जिल्हा परिषद, ग्रामपंचायत यासारख्या अन्य फंडातून झाली आहेत तर काही प्रस्तावितही आहेत.यातील गंभीर बाब म्हणजे विकासकामांवर खर्च करण्यात आला आहे त्याची एकत्रित आकडेवारी ग्रामपंचायतीकडे नाही, तसेच तहसीलदार अथवा प्रांताधिकारी यांच्याकडेही नाही.जिल्ह्यातील विकासकामांचे नियोजन करणाºया जिल्हा नियोजन समिती कार्यालयाकडेही झालेल्या खर्चाचा एकत्रित तपशील उपलब्ध नव्हता. ग्रामपंचायत, तहसीलदार, प्रांताधिकारी कार्यालयाकडे तो मिळू शकेल, असे सांगण्यात आले. मात्र प्रत्यक्षात अशा खर्चाची एकत्रित आकडेवारी कोणाकडेच सापडली नाही. त्यामुळे आदर्श सांसद ग्राम योजनेतील कामे खरोखरच झाली आहेत का अथवा ती कागदावरतीच पूर्ण केल्याचे दाखवले जात आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया चिंचोटीचे ग्रामस्थ अ‍ॅड. राकेश पाटील यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली. गावामध्ये जी कामे झाली आहेत त्या कामांचा दर्जा संबंधित अधिकाºयांनी कधी तपासून पाहिला आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.दर तीन महिन्यांनीआढावा बैठक आवश्यकनियमानुसार सांसद आदर्श ग्राम योजनेचा आढावा संबंधित खासदारांनी दर तीन महिन्यांनी घेणे आवश्यक आहे.मात्र गेल्या वर्षभरात अशा कोणत्याच कामांचा आढावा घेण्यासाठी कोणत्याच खासदारांनी स्वारस्य दाखवले नसल्याचे समोर आले आहे.त्यामुळे या योजनेसाठी खासदार उत्साही नसल्याचे दिसून येते. विशेष बाब म्हणजे यातील दोन खासदार शिवसेनेचे, तर एक खासदार भाजपाचा आहे. तीनही खासदार हे केंद्रामध्ये सत्तेत सहभागी आहेत.