शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई पोर्ट ट्र्स्ट करणार ४० कोटींच्या ‘रोपॅक्स’ जहाजाची खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2019 02:04 IST

नव्याने सुरू होणाऱ्या रो-रो वाहतुकीसाठी ४० कोटींच्या ‘रोपॅक्स’ या अजस्त्र जहाजाची खरेदी मुंबई पोर्ट ट्रस्ट (एमपीटी) करणार आहे. मांडवा ते भाऊचा धक्का येथील रो-रो सेवेबाबतचे प्रकरण न्यायालयात असल्याने न्यायालयाच्या निर्णयानंतरच तेथे रो-रो सेवेला प्रारंभ होणार आहे.

- आविष्कार देसाईअलिबाग : नव्याने सुरू होणाऱ्या रो-रो वाहतुकीसाठी ४० कोटींच्या ‘रोपॅक्स’ या अजस्त्र जहाजाची खरेदी मुंबई पोर्ट ट्रस्ट (एमपीटी) करणार आहे. मांडवा ते भाऊचा धक्का येथील रो-रो सेवेबाबतचे प्रकरण न्यायालयात असल्याने न्यायालयाच्या निर्णयानंतरच तेथे रो-रो सेवेला प्रारंभ होणार आहे.त्यामुळे सध्या या जहाजाचा वापर मुंबई ते दिघी आणि मुंबई ते नेरुळ येथील रो-रो सेवेसाठी करण्यात येणार असल्याचे मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया यांनी सांगितले. त्यामुळे सध्यातरी मांडवा ते भाऊचा धक्का येथील रो-रो सेवेचा मार्ग खडतर असल्याचे दिसून येते.जहाज खरेदीसाठी ४० कोटी रुपये खर्च असल्याने मुंबई पोर्ट ट्रस्ट यासाठी स्वत:कडील १० कोटी आणि ‘जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट’, ‘महाराष्ट्र सागरी महामंडळ’ आणि ‘शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ’ (सिडको) यांच्याकडून प्रत्येकी दहा कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य घेणार आहे.जलवाहतुकीला प्राधान्य देणारे प्रकल्प मुंबई पोर्ट ट्रस्टने आखले आहेत. याअंतर्गत ‘रोपॅक्स’ जहाजाची खरेदी पोर्ट ट्रस्टकडून करण्यात येणार आहे. यापूर्वी ‘रोपॅक्स’च्या खरेदीसाठी नेमलेले तीन कंत्राटदार जहाज प्रवाशांच्या सेवेत आणण्यात अयशस्वी झाले आहेत. त्यातील एका कंत्राटदाराने ‘एमएमबी’ विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतल्याने कंत्राटदारांकडून होणाºया रोपॅक्सच्या खरेदीचे प्रकरण न्यायप्रविष्ट झाले आहे, त्यामुळे ‘बीपीटी’ने तीन संस्थांची आर्थिक मदत घेतली आहे.- ‘रोपॅक्स’ या जहाजात दहा बस, सुमारे ६० गाड्या आणि २०० प्रवासी सामावून घेता येऊ शकतात.हे जहाज खरेदी करण्यासाठी जेएनपीटी, एमएमबी आणि सिडको प्रत्येकी दहा कोटी अर्थसाहाय्य करणार आहे.- भाऊचा धक्का ते मांडवा या सेवेच्या माध्यमातून मिळणारा नफा चारही संस्था वाटून घेणार आहेत.- याबाबतच्या निविदा लवकरच काढण्यात येऊन पुढील चार महिन्यांत मुंबई-दिघी आणि मुंबई- नेरळ या ठिकाणी रोपॅक्स प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असल्याचे भाटिया यांनी सांगितले.

टॅग्स :Raigadरायगड