शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

साार्वजनिक बांधकाममंत्र्यांनी केली मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2019 00:20 IST

मुंबई-गोवा महामार्गाच्या कामकाजाची पाहणी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली

पोलादपूर : मुंबई-गोवा महामार्गाच्या कामकाजाची पाहणी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली असून पोलादपूर येथे दिलेल्या खासगी भेटीनंतर रत्नागिरी जिल्ह्यातील खेड हद्दीत चालू असलेल्या बोगद्याची पाहणी करून कामकाजाबाबत माहिती घेतली. बांधकामाची गती वाढवून डिसेंबर २०१९ पर्यंत संपूर्ण मुंबई-गोवा महामार्गावर किमान दोन मार्गिका वाहतूक सुरू करण्यासाठी नियोजनबद्ध कार्यवाही करावी, अशा सूचना कंत्राटदारांना व महामार्ग अधिकाऱ्यांना त्यांनी दिल्या. तसेच महामार्गाचे काम २०२० पर्र्यंत पूर्ण करणार असल्याची ग्वाही दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.दोन दिवस चंद्रकांत पाटील यांनी रत्नागिरी व रायगड येथील रस्त्यांची आणि चिपळूण ते वडखळ या राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाची पाहणी केली. त्यानंतर कंत्राटदारांच्या काही ठिकाणी अवलंबलेल्या ढिसाळ कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. महामार्गाच्या कामाची अधिकाऱ्यांनी जातीने देखरेख करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.रस्त्यांवरील सर्व खड्डे तातडीने बुजवणे तसेच पावसाचा जोर पाहता अपघात टाळण्यासाठी अधिकाºयांना सतर्क राहण्याचे आदेश दिले. मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाटात उभारण्यात येणाºया वैशिष्ट्यपूर्ण बोगद्याच्या कामाचीही पाहणी केली. बांधकामाची कामाची गती वाढवून डिसेंबर २०१९ पर्यंत संपूर्ण मुंबई-गोवा महामार्गावर किमान दोन मार्गिका वाहतूक सुरू करण्यासाठी नियोजनबद्ध कार्यवाही करावी अशा सूचना कंत्राटदारांना व महामार्ग अधिकाºयांना केल्या. चौपदरीकरणाचे संपूर्ण काम डिसेंबर २०२० पर्यंत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण झालेच पाहिजे, असे स्पष्ट निर्देशही दिले. गणेशोत्सवात कोकणात येणाºया चाकरमान्यांचा या महामार्गावरून प्रवास सुखकर होईल, याची पूर्ण दक्षता घेण्याचे आदेशही संबंधित अधिकाºयांना त्यांनी या वेळी दिले.>प्रवास होणार जलद व सुरक्षितमुंबई-गोवा महामार्गावरील रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणारा कशेडी घाट हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. या घाटातील धोकादायक वळणांमुळे अपघाताच्या घटना घडतात. या दुर्घटना टाळण्यासाठी आणि चाकरमान्यांचा प्रवास कमी वेळात, सुरक्षित करण्यासाठी १.८० आणि १.९० किमीचे दोन बोगदे बनविण्याचे काम डिसेंबर २०२० पर्यंत पूर्णत्वास जाणार आहे. कशेडी बोगद्याचे १५० मीटर खोदकाम पूर्ण झाले असून, उर्वरित काम विहित मुदतीत पूर्ण करण्यात येईल, मुंबई-गोवा महामार्गाचे काम डिसेंबर, २०२० पर्यंत पूर्ण होईल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.