शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

रायगडावर पर्यटकांना सुविधा मिळवून देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 02:58 IST

किल्ल्याच्या पायऱ्यांचे काम सुरू

महाड : किल्ले रायगडवर पर्यटकांसाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, अशी ग्वाही केंद्रीय पर्यटन विकास राज्यमंत्री के. जे. अल्फोन्स यांनी शनिवारी दिली. तर रायगड किल्ल्याचा इतिहास जगाच्या नकाशावर पोहोचावा, यासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्नात असल्याचे रायगड प्राधिकरणचे अध्यक्ष खा. संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले.केंद्रीय पर्यटन विकास राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) के. जे. अल्फोन्स यांनी किल्ले रायगडला भेट देऊन प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध कामांची शनिवारी पाहणी केली आणि या कामांचा आढावा घेतला. या वेळी त्यांच्यासमवेत रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष खा. संभाजीराजे छत्रपती, प्राधिकरणाचे सदस्य पांडूरंग बलकवडे, सुधीर थोरात, पुरातत्त्व विभागाचे अधिकारी बिपीनचंद्र नेगी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे महाड येथील कार्यकारी अभियंता सातपुते उपस्थित होते.किल्ले रायगडवर आगमन झाल्यानंतर अल्फोन्स यांनी रोप वे ते कुशावर्त तलाव मार्गे होळीच्या माळापर्यंत सुरू असलेल्या पथमार्गाची पाहणी आणि जुन्या वाड्यांच्या उत्खननाच्या कामाची पाहणी केली. त्यानंतर पुरातत्त्व विभागाच्या कार्यालयामध्ये उत्खननामध्ये सापडलेल्या शिवकालीन वस्तू आणि ऐवजाचीही पाहणी केली. त्यानंतर जगदिश्वर मंदिर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळावर जाऊन अभिवादन केले. तेथून परत आल्यानंतर राजसदरेवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तेथेच पुरातत्त्व विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून गडावर सुरू असलेल्या कामांची माहिती घेतली.किल्ल्याच्या पायऱ्यांचे काम सुरूप्राधिकरणाचे अध्यक्ष खा. संभाजीराजे छत्रपती यांनी या वेळेस किल्ले रायगडवरील फरसबांधणी, उत्खनन, पथमार्ग आणि पायºयांचे बांधकाम सुरू असल्याची माहिती दिली.उत्खननामध्ये सापडलेल्या काही वस्तू औरंगाबाद येथील पुरातत्त्व विभागाच्या संग्रहालयात ठेवण्यात आल्या आहेत. या सर्व वस्तू एकत्र करून ६ जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या दिवशी त्या शिवभक्तांना पाहण्यासाठी गडावर आणण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शिवजयंती, शिवराज्याभिषेक सोहळा तारखेनुसार किंवा तिथीनुसार साजरा करणे, हा प्रत्येकाचा अधिकार असून तारीख-तिथीच्या वादात न पडता, सर्व विचारांच्या मंडळींचा रायगड प्राधिकरणात समावेश करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :RaigadरायगडFortगड