उरणमध्ये मणिपूर घटनेविरोधात निदर्शने; मविआनं दिल्या भाजपाविरोधात घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2023 12:56 PM2023-07-26T12:56:09+5:302023-07-26T12:56:32+5:30

मणिपूरमधील महिलांवर झालेल्या व होणाऱ्याअत्याचाऱ्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या केंद्र व मणिपूर सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

Protests against Manipur Constitution in Uran; Maviya announced against BJP | उरणमध्ये मणिपूर घटनेविरोधात निदर्शने; मविआनं दिल्या भाजपाविरोधात घोषणा

उरणमध्ये मणिपूर घटनेविरोधात निदर्शने; मविआनं दिल्या भाजपाविरोधात घोषणा

googlenewsNext

मधूकर ठाकूर 

उरण - मणिपूर येथील महिला अत्याचाराच्या विरोधात मंगळवारी महाविकास आघाडी व विविध पक्ष संघटनांच्या वतीने गांधी चौकात केंद्र व मणिपूर सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने करून निषेध व्यक्त केला. यावेळी महिला,कामगार,शेतकरी व युवक संघटनाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

मणिपूरमधील महिलांवर झालेल्या व होणाऱ्या अत्याचाऱ्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या केंद्र व मणिपूर सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. केंद्र व राज्य सरकारचा निषेध करतानाच मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, दोषींना कडक शिक्षा द्यावी,मणिपूर मधील घटनेने देशाची जगात नाचक्की झाली आहे.त्यामुळे या घटनांची गांभीर्याने नोंद घेऊन निःपक्षपाती कारवाई करावी. देशातील नागरीकांमध्ये जाती धर्माच्या नावाने भेद करणाऱ्या पासून सावध राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. 

याप्रसंगी शिवसेना (उध्दव ठाकरे) माजी आमदार तथा जिल्हा प्रमुख मनोहर भोईर,राष्ट्रवादी(शरद पवार) राज्य सरचिटणीस प्रशांत पाटील, कामगार नेते भूषण पाटील,काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे, माकप रायगड जिल्हा सचिव रामचंद्र म्हात्रे, किसान सभा नेते संजय ठाकूर, जनवादी महिला संघटनेच्या राज्य उपाध्यक्ष हेमलता पाटील, रायगड अध्यक्ष अमिता ठाकूर,शेकापच्या सीमा घरत,डीवायएफआय युवक संघटनेचे कार्यकर्ते  यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Protests against Manipur Constitution in Uran; Maviya announced against BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.