शहरं
Join us  
Trending Stories
1
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
3
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
4
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
5
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
6
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
7
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
8
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
9
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
10
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
11
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
12
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
13
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
14
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
15
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
16
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
17
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
18
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
19
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
20
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार

रायगड सुरक्षा मंडळात भरती प्रस्ताव

By admin | Updated: October 28, 2015 00:56 IST

सुरक्षारक्षक म्हटले की नको ती राखणदारी, असे बोलले जाते, त्यामुळे कुणीही याकडे फारसे वळत नाही. मात्र रायगड सुरक्षा रक्षक मंडळाने दिलेल्या योगदानामुळे या क्षेत्राकडे करिअर

प्रशांत शेडगे, पनवेलसुरक्षारक्षक म्हटले की नको ती राखणदारी, असे बोलले जाते, त्यामुळे कुणीही याकडे फारसे वळत नाही. मात्र रायगड सुरक्षा रक्षक मंडळाने दिलेल्या योगदानामुळे या क्षेत्राकडे करिअर म्हणून तरुण पाहू लागले आहेत. त्यातच किमान वेतनाबरोबरच इतर भत्ते आणि सुविधा मिळू लागल्या आहेत. रायगडात एकूण १५00 सुरक्षारक्षक सुरक्षित झाले आहेत. मंडळाने नव्याने भरती प्रस्ताव सरकार दरबारी सादर केल्याने आगामी काळात आणखी एक हजार तरुणांना नव्याने रोजगार उपलब्ध होण्याची शक्यता आहे. रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कंपन्या, शासकीय आणि निमशासकीय कार्यालये आहेत. या व्यतिरिक्त जेएनपीटी, ओएनजीसी, लोहपोलाद -मार्केट, सिडको, एफसीआय अशा मोठमोठ्या आस्थापना आहेत. या ठिकाणी पूर्वी खाजगी एजन्सीकडून सुरक्षारक्षक पुरवले जात असे. मात्र संबंधितांकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक शोषण केले जात असल्याच्या तक्र ारी येऊ लागल्या. त्यामुळे मुंबईप्रमाणे रायगडातही २००२ साली सुरक्षा रक्षक मंडळ स्थापन करण्यात आले.या मंडळाचे प्रत्यक्ष काम हे २००६ साली सुरू करण्यात असून सुमारे १९५0 सुरक्षारक्षक नोंदणीकृत आहेत. त्यापैकी १५00 जण महावितरण, एमआयडीसी, टाटा पॉवर, स्टील मार्केट, सागरी सुरक्षा आणि काही प्रमाणात सिडकोत काम करतात. उर्वरित ४00पैकी काही जण निवृत्त तर काहींनी इतर ठिकाणी नोकरी मिळाली म्हणून राजीनामे दिले आहेत. काही आस्थापनात सुरक्षा रक्षक नियुक्तीच्या प्रतीक्षेत असून मंडळ त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे.सुरक्षारक्षक मंडळात स्थानिक तरुणांना अधिक प्राधान्य दिले जाते. त्यांना योग्य प्रशिक्षण दिले जाते तसेच प्रामाणिकपणा, विश्वास, नियमितपणा, दक्षता या चतु:सूत्रीवर भर असल्याने सुरक्षारक्षकांची मागणी वाढली आहे. शासकीय त्याचबरोबर खाजगी आस्थापना मंडळाकडे नोंदणीकृत होवू लागले आहेत. दिवसेंदिवस सुरक्षारक्षकांची मागणी वाढत असल्याने नव्याने भरती करण्याचा प्रस्ताव मंडळाने तयार करून तो कामगार विभागाकडे पाठवला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर लागलीच भरती प्रक्रि या हाती घेण्यात येणार आहे.