शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

खारभूमी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 01:06 IST

रायगडचे विद्यमान जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी प्रथमच खारेपाटातील लाभक्षेत्रात खारेपाणी घुसून झालेल्या

अलिबाग : रायगडचे विद्यमान जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी प्रथमच खारेपाटातील लाभक्षेत्रात खारेपाणी घुसून झालेल्या नुकसानाची नोंद घेऊ न शेतकºयांना नुकसान भरपाई मिळावी, म्हणून शासनास प्रस्ताव सादर केला आहे. ‘विशेष बाब’ म्हणून खारभूमी नुकसानग्रस्त शेतकºयांना आर्थिक मदत मंजूर करावी, असा प्रस्ताव राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाच्या सचिवांना सादर केला आहे. शेतकºयांसाठी घेतलेल्या निर्णयाचे श्रमिक मुक्ती दल रायगड स्वागत करून आभार व्यक्त करीत असून, तसे लेखी पत्र जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांना श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने देण्यात आले असल्याची माहिती श्रमिक मुक्ती दलाचे रायगड जिल्हा समन्वयक राजन भगत यांनी दिली आहे.श्रमिक मुक्ती दलाच्या माध्यमातून खारेपाटातील जमिनींना दुपीकी करण्यासाठी आंबाखोरे प्रकल्पाचे पाणी मिळण्यासाठी, खारेपाटातील नापीक जमिनी सुपीक होण्यासाठी, खारेपाटातील नापीक जमिनींच्या शेतकºयांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी २० एप्रिल २००७ ते ४ मे २००७ असे सलग १६ दिवसांचे केलेले ठिय्या आंदोलन याचा संपूर्ण इतिहास याच आभारपत्रात जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांना सादर केला आहे.खारेपाटातील या मागण्यांसंदर्भात तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या समवेत बैठक होऊन त्या तत्त्वत: मान्य झाल्या होत्या आणि किमान त्यावर चर्चा सुरू झाली. १४ आॅक्टोबर २००७ रोजी ‘समृद्ध कोकण सुंदर कोकण परिषद’ श्रमिक मुक्ती दलाने घेतली होती, त्यात ४० गावांतील शेतकºयांचा सहभाग होता. आंबाखोरे प्रकल्पाचे पाणी व खारेपाटाचा विकास व नुकसान भरपाई व इतर मागण्यांसहित १० हजार शेतकºयांनी एक रात्रभर कुलाबा किल्ल्यात स्वत:ला कोंडून घेऊ न अभूतपूर्व आंदोलन केले होते. मात्र, या मागण्या रीतसर पद्धतीने शासनापर्यंत या पूर्वीच्या कोणत्याही जिल्हाधिकाºयांनी वरिष्ठ स्तरावर व राज्य शासनापर्यंत पोहोचवण्याचे काम केलेले नाही, असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.