शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी चोख बंदोबस्त

By निखिल म्हात्रे | Updated: May 5, 2024 22:31 IST

याबाबतची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.

अलिबाग : ७ मे रोजी होणाऱ्या मतदानासाठी पोलिस प्रशासनही सज्ज झाले आहे. आतापर्यंत आचारसंहिताभंगाबाबत ६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. १९० पोलिस अधिकारी, २ हजार ६० कर्मचारी, १ हजार ४२५ होमगार्ड, ६० आरपीसी, २३ क्युआरटी तैनात केले असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.

रायगड मतदारसंघात १६ लाख ६८ हजार ३७२ मतदार आहेत. यामध्ये पुरुष ८ लाख २० हजार ६०५ आणि महिला ८ लाख ४७ हजार ७६३ आणि तृतीयपंथी ४ आहेत. तर जिल्ह्यात २ हजार १८५ मतदान केंद्रे आहेत. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी याकरिता जिल्हा पोलिस दलाने कंबर कसली आहे. मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी विविध ठिकाणी पोलिसांची पथसंचलन झाली आहेत. याव्यतिरिक्त केंद्रीय राखीव पोलिस दलाची एक तुकडी तैनात केली आहे. जिल्ह्यात नियुक्त क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या वाहनांवर बिनतारी संदेश यंत्रणा बसविण्यात आली आहे. सहा केंद्रांवर अतिरिक्त बंदोबस्तअलिबाग दोन, श्रीवर्धन १, दापोली १, गुहाघर विधानसभा मतदारसंघातील दोन अशी सहा मतदान केंद्रे ही क्रिटिकल पोलिंग स्टेशन म्हणून निश्चित केली आहेत. येथे अतिरिक्त पोलिस बंदोबस्त पुरविण्यात आला आहे. एकही संवेदनशील किंवा अतिसंवेदनशील केंद्र नाही. अचारसंहिताभंगाचे सहा गुन्हे दाखलआचारसंहितेचा भंग केला म्हणून आतापर्यंत सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये खारपाडा येथे एका महिलेने तपासादरम्यान कॅमेरा फोडला, दिघी सागरीमध्ये एका लग्नादरम्यान दोन ग्रुपमध्ये झालेली भांडणे, महाडमध्ये १ तर मतदानासंदर्भात एक ऑडिओ फिरत असल्याने सुमोटा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :alibaugअलिबाग