शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना अखेर मिळाला न्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 02:26 IST

अतिरिक्त पातालगंगा एमआयडीसी औद्योगिक क्षेत्रात कासप -चावणे हद्दीतील मे. हुंदाई मोबीज इंडिया लिमिटेड कंपनीतील १२० कामगारांना कंपनीने अचानक

मोहोपाडा : अतिरिक्त पातालगंगा एमआयडीसी औद्योगिक क्षेत्रात कासप -चावणे हद्दीतील मे. हुंदाई मोबीज इंडिया लिमिटेड कंपनीतील १२० कामगारांना कंपनीने अचानक प्रवेश नाकारला होता. तसेच या ठिकाणच्या प्रकल्पग्रस्त शेतकºयांची फसवणूक केल्याने शेतकºयांनी आमरण उपोषण सुरू केले होते. अखेर आमदार मनोहर भोईर यांनी कंपनी व्यवस्थापनाबरोबर चर्चा करून कामगारांना व प्रकल्पग्रस्त शेतकºयांना न्याय मिळवून दिला.कासप व चावणे परिसरातील स्थानिक शेतकºयांची जमीन मे. हुंदाई मोबीज इंडिया लिमिटेड कंपनीला गेली आहे. येथे प्रकल्प उभा राहताना कंपनीने शेतकºयांबरोबर आपलेपणाची वागणूक दिली; परंतु कंपनी उभी राहताच शेतकºयांकडे दुर्लक्ष केले. प्रकल्पग्रस्त शेतकºयांना ठरल्याप्रमाणे कंत्राट न देता कंपनीने बाहेरील कंत्राटदारांना काम दिले. लेखी आश्वासन देऊनही प्रकल्पग्रस्त शेतकºयांची फसवणूक होत असल्याने शेतकरी अरुण पाटील यांनी इतर शेतकºयांच्या मदतीने आमरण उपोषण सुरू केले होते. सात दिवसांत न्याय न मिळाल्यास अरुण पाटील हे विषप्राशन करून जीवन संपविणार असल्याचेही प्रसिद्धी माध्यमांनी म्हटले होते; परंतु उपोषणाच्या चौथ्या दिवशीच आमदार मनोहर भोईर व शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेंद्र थोरवे यांनी कंपनी व्यवस्थापनाला धारेवर धरत आमरण उपोषणकर्ते अरुण पाटील यांना न्याय मिळवून दिला. या वेळी पाटील यांचे कंपनीचे विभागप्रमुख मुरली यांच्या उपस्थितीत उपोषण सोडण्यात आले.हुंदाई कंपनीत काम करणाºया १२० कामगारांना गेटबाहेर ठेवले होते. त्यांना पूर्ववत कामावर घेण्यासाठी आमदार भोईर यांनी हुंदाई एचओडी मुरली यांच्याशी चर्चा करून कामगारांना आत घेण्यास सांगितले. या वेळी १०१ कामगारांना लागलीच कामावर घेतले, तर १९ कामगारांना येत्या मंगळवारी घेणार असल्याचे सांगण्यात आले. या वेळी कामगारांच्या मागण्याही मान्य करण्यात आल्या.