शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
3
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
4
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
5
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
6
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
7
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
8
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
9
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
10
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
11
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
12
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
13
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
14
जळगाव जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी सागर चित्रे! उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता झाल्टे; विजयी उमेदवारांचा जल्लोष
15
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
16
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
17
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
18
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
19
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
20
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 

डॉक्टरांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 23:26 IST

आंदोलनाच्या ठिकाणी महत्त्वपूर्ण ठराव पारित; जिल्हाभरात ठिकठिकाणी डॉक्टरांनी पुकारला बंद

अलिबाग : केंद्र सरकारने सर्व प्रकारच्या आरोग्य आस्थापनावर होणारा हिंसाचार रोखण्यासाठी तातडीने एक केंद्रीय कायदा करावा. वर्ल्ड मेडिकल असोसिएशनने देखील आयएमएला पाठिंबा दिला आहे. सर्व सदस्य देशांनी डॉक्टरांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी तातडीने कडक कायदे करावेत अशा मागणीच्या ठरावाला सर्व डॉक्टरांनी पाठिंबा दिला. मेडिकल असो. डॉक्टरांच्या या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय पाठबळ मिळवण्यासाठी त्यांनी एक पाऊल पुढे टाकल्याचे त्या निमित्ताने अधोरेखित होते.कोलकाता येथील एनआरएस वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टरांवर केलेल्या सशस्त्र हल्ल्यामध्ये अनेक डॉक्टर्स गंभीर जखमी झाले होते. त्याच्या निषेधार्थ सोमवारी रायगड मेडिकल असोसिएशनमधील डॉक्टरांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. निषेधाचे निवेदन त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. तत्पूर्वी हिराकोट तलावाजवळ आंदोलक डॉक्टरांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. त्यामध्ये महत्त्वपूर्ण ठराव पारित करण्यात आले.डॉक्टरांवर जमावाकडून असे हल्ले होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. ही अत्यंत चिंतेची व निंदनीय बाब आहे.आजकाल वैद्यकीय व्यावसायिक आणि रुग्णालय यावर हिंसाचार वाढत आहे. आयएमएने वेळोवेळी या विरु द्ध आवाज उठविला आहे. देशभरात सर्व डॉक्टर्स काळ््या फिती लावून काम करतील, तसेच जागोजागी धरणे धरणार असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. अशा प्रकारच्या हिंसाचारामुळे तेथील रुग्ण वेठीस धरले जातात. तसेच अशा गोष्टींमुळे रु ग्णालय कर्मचारी आणि वैद्यकीय व्यावसायिक सातत्याने दहशतीच्या खाली असल्याने त्यांची कार्यक्षमता देखील खालावते. याचा थेट रु ग्णांच्या म्हणजे समाजाच्या आरोग्य व्यवस्थेवर दीर्घकालीन आणि विपरीत परिणाम होऊ शकतो. कोणताही डॉक्टर अशा हिंसाचाराच्या भीतीने अत्यवस्थ रु ग्णांना आपल्या रुग्णालयात दाखल करण्यास तयार होणार नसल्याचे म्हटले आहे. याप्रसंगी आयएमए अलिबागचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र चांदोरकर, सचिव डॉ. संजीव शेटकार, डॉ. चंद्रकांत वाजे, डॉ. किरण नाबर, डॉ. विनायक पाटील, डॉ.मोहन रानवडे, डॉ. राजीव धामणकर, डॉ. तिवारी आदी उपस्थित होते.डॉक्टरांना मारहाणप्रकरणी खोपोलीत निषेधखोपोली : पश्चिम बंगालमधील एनआरएस मेडिकल कॉलेजमधील डॉक्टरांना मारहाणीचे पडसाद रायगड जिल्ह्यात उमटले आहे. वैद्यकीय क्षेत्रातील इमा या राज्यव्यापी संघटनेने पुकारलेल्या बंदला प्रतिसाद देत खोपोली शहर व खालापूर तालुक्यातील डॉक्टरांनी एक दिवस रुग्णालय बंद ठेवून निषेध व्यक्त केला. यासंबंधीचे निवेदन संघटनेच्या वतीने खोपोली नगरपालिका, तहसीलदार खालापूर व खालापूर पोलीस ठाणे याठिकाणी देण्यात आले. पश्चिम बंगालमधील एनआरएस मेडिकल कॉलेजमधील डॉक्टरांना १० जून रोजी रुग्णांच्या नातेवाइकांकडून बेदम मारहाण केली. यात एका डॉक्टरचा मृत्यू झाला, तर दुसरे डॉक्टर मृत्यूशी झुंज देत आहेत. या घटनेचे संपूर्ण भारतभर पडसाद उमटले. डॉक्टरांच्या इंडियन मेडिकल असोसिएशन या इमा संघटनेने या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. खोपोली व खालापूर तालुक्यातील डॉक्टरांनी सोमवारी बाह्यरुग्ण विभाग बंद ठेवून निषेध व्यक्त करीत तहसीलदार, पोलीस ठाणे, व नगरपालिका या शासकीय कार्यालयांना निवेदन दिले. संघटनेचे माजी जिल्हा अध्यक्ष डॉ. सुनील डोंगरे, डॉ. सुभाष कटकदौंड, डॉ. सतीश जाखोटीया, डॉ.संजय साबणे, डॉ. शैलेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली खोपोलीतील अनेक डॉक्टर या आंदोलनात सहभागी झाले होते.नागोठण्यातील डॉक्टर संपात सहभागीनागोठणे : पश्चिम बंगालमधील डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनने पुकारलेल्या देशव्यापी संपाला नागोठणेतील डॉक्टरांनी सोमवारी पाठिंबा देत आपले दवाखाने दिवसभर बंद ठेवले. बंदमध्ये शहरातील सर्वच्या सर्व डॉक्टरांनी सामील होत दवाखाने तसेच रुग्णालये बंद ठेवून आपला निषेध नोंदविला. शहरातील २२ डॉक्टर या बंदमध्ये सहभागी झाले होते.मुरुडमधील दवाखाने बंदमुरुड जंजिरा : तालुक्यातील सर्व दवाखाने सोमवारी बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे काही रुग्णांची गैरसोय झाली. कोलकाता येथे मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांवर करण्यात आलेल्या प्राणघातक हल्ल्याचा जंजिरा मेडिकल असोसिएशन मुरुडतर्फे तीव्र निषेध करण्यात आला आहे. डॉक्टरांवरील हल्ल्यासंदर्भात कायदा होऊनही त्याची योग्य प्रकारे अंमलबजावणी होताना दिसत नाही. मुरुड तालुक्यातील सर्व डॉक्टर्सने संपात सहभाग घेऊन खाजगी दवाखाने बंद ठेवले होते. जंजिरा मेडिकल असोसिएशनतर्फे मुरुड तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले.

टॅग्स :doctorडॉक्टरStrikeसंप