शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

रायगड जिल्ह्यातील आंब्याचे उत्पादन यंदा ५० टक्क्यांनी कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2019 05:26 IST

बदलत्या हवामानाचा फटका कोकणातील आंबा उत्पादकांना बसतो आहे.

पेण  - बदलत्या हवामानाचा फटका कोकणातील आंबा उत्पादकांना बसतो आहे. आधीच उशिरापर्यंत लांबलेली थंडी त्यातच मागील १५ दिवसांपासून वाढलेले तापमान या दुहेरी संकटामुळे रायगड जिल्ह्यात यंदा आंब्याचे उत्पादन ५० टक्क्यांनी कमी झाले आहे, त्यामुळे एकूण व्यवसायावर परिणाम होण्याची भीती आंबा बागायतदार व्यक्त करत आहेत.रायगड जिल्ह्यातील आंबा लागवडीखाली एकूण ४४ हजार हेक्टर क्षेत्र आहे. यापैकी १४ हजार ५०० हेक्टर उत्पादनक्षम क्षेत्र आहे. यातून दरवर्षी जवळपास २२ हजार ४२४ मेट्रिक टन एवढे उत्पादन अपेक्षित असते. सुरुवातीला चांगली थंडी पडल्याने आंबा पीक चांगले येईल, अशी अपेक्षा बागायतदारांना होती; परंतु लांबलेली थंडी व वाढलेल्या तापमानाचा आता आंबा पिकावर विपरित परिणाम दिसून येत आहेत.यंदाच्या हंगामात डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून थंडीला सुरुवात झाली. अगदी सुरुवातीला पडलेल्या थंडीमुळे उत्पादनक्षम क्षेत्रापैकी ८० ते ८५ टक्के क्षेत्रावर मोहर आला होता; परंतु नंतर पुन्हा थंडीचा जोर वाढला. त्यामुळे फलधारणा कमी झाली. याबरोबरच तुडतुडा, भुरी रोगाचा प्रादुर्भाव यामुळे साधारण ७० टक्के मोहर गळून पडला.यंदा केवळ ५० टक्के मोहरात फलधारणा झाली. मात्र, आंबा तयार होण्याच्या स्थितीत असतानाच एप्रिल महिन्यात तापमानात वाढ झाली. उष्णतेचे परिणाम आंब्यावर झाले. आंब्याचे फळ मोठ्या प्रमाणात गळून पडण्यास सुरुवात झाली. आंबा डागाळू लागला. त्यामुळे वातावरणाच्या बदलाशी सामना करताना बागायतदार चिंतातूर झाले.ते आंबे आंध्र किंवा कर्नाटकातलेरायगड जिल्ह्यातील आंबा उशिरा बाजारात येतो. तळकोकणातला आंबा अजून मुबलक प्रमाणात बाजारात आलेला नाही. सध्या बाजारात जो मोठ्या प्रमाणात आंबा दिसतो आहे, तो कोकणातील हापूस नसून आंध्र प्रदेश व कर्नाटकातील आंबा असल्याचे बागायदार सांगतात.

टॅग्स :MangoआंबाRaigadरायगड