शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

प्राथमिक शाळेचे विद्यार्थी गणवेशापासून वंचितच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 03:14 IST

महाड तालुक्यात शाळा सुरू होऊन तीन महिने झाले तरी अद्याप शासनाकडून गणवेशाकरिता देण्यात येणाऱ्या पैशाचा पत्ताच नसल्याने विद्यार्थी गणवेशापासून वंचित राहिले आहेत.

- सिकंदर अनवारेदासगाव - महाड तालुक्यात शाळा सुरू होऊन तीन महिने झाले तरी अद्याप शासनाकडून गणवेशाकरिता देण्यात येणाऱ्या पैशाचा पत्ताच नसल्याने विद्यार्थी गणवेशापासून वंचित राहिले आहेत. विद्यार्थ्यांकरिता काढण्यात आलेल्या बँक खात्यात ही रक्कम जमा होणार होती, मात्र अद्याप बँक खाती रिकामीच आहेत. बँक खात्यामध्ये पैसा जमा न झाल्याने विद्यार्थ्यांना गतवर्षाचेच गणवेश वापरावे लागत आहे.शासनाने गेली तीन वर्षांपासून मागासवर्गीय घटकातील मुले, सर्व मुली, दारिद्र्य रेषेखालील मुले अशा मुलांना मोफत गणवेशाची सुविधा निर्माण करून दिली आहे. या योजनेअंतर्गत या घटकातील मुले तसेच मुलींना दोन गणवेश दिले जातात. प्रथम वर्षी शासनाने या लाभार्थी मुलांना कापड दिले आणि शिलाई रक्कम त्यांना देण्यात आली. दुसºया वर्षापासून प्रतिमुलामागे दोन गणवेशाकरिता ४00 रुपये शासन देत आहे. शाळा समित्यांकडेच गणवेश खरेदीची जबाबदारी देण्यात आली होती, मात्र गेल्या वर्षापासून यामध्येही बदल करण्यात आला आहे. शासनाच्या गणवेश खरेदीकरिता येणारे पैसे हे विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जात आहेत. याकरिता प्रत्येक विद्यार्थ्याचे बँक खाते उघडण्यात आले आहे. वास्तविक पाहता शासनाने गणवेश खरेदीकरिता लागणारे पैसे हे मे महिन्यातच विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करणे अपेक्षित होते, मात्र दोन महिने उलटून देखील महाड तालुक्यातील बहुतांश प्राथमिक शाळांमध्ये गणवेश वाटप झालेले दिसून येत नाही. त्यामुळे यंदा जुनाच गणवेश घालून विद्यार्थी शाळेत येत आहेत.महाड तालुक्यात रायगड जिल्हा परिषदेच्या एकूण ३३३ शाळा आहेत तर या प्राथमिक शाळांमधून जवळपास ९००० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यापैकी मागासवर्गीय, दारिद्र्य रेषेखालील आणि सर्व मुलींना जून महिन्यात गणवेश मिळणे क्र मप्राप्त होते, मात्र शासनाने गत वर्षापासून या प्रक्रि येत बदल करून विद्यार्थ्यांच्या बँक खात्यातच थेट पैसे जमा केले जाणार आहेत. याकरिता प्रत्येक विद्यार्थ्याचे बँक खाते काढण्यात आले असून यामध्ये बँक खाते उघडल्यापासून एक रुपयाही जमा झालेला नाही. शासनाने गणवेश खरेदीमधील घोटाळा लक्षात घेवून अखेर हा निर्णय घेतला असला तरी यावर्षी अद्याप गणवेशाचे पैसे विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा झालेले नाही. यामुळे प्राथमिक शिक्षक विद्यार्थ्यांकरिता गणवेश मिळावा याकरिता दानशूरांकडे मागणी करत आहेत. अनेक शाळांमधील विद्यार्थी जुना गणवेश घालून शाळेत येत आहेत.नव्याने दाखल झालेल्या मुलांकडे गणवेशच नसल्याने दैनंदिन वापरातील कपडे घालूनच हे विद्यार्थी शाळेत येत आहेत. महाड तालुक्यातील बहुतांश शाळा या ग्रामीण आणि दुर्गम भागात वसलेल्या शाळा आहेत. यामध्ये शेतकरी, मजूर, आणि अल्प घटकातील पालकांचीच मुले शिक्षण घेत आहेत. अशा पालकांना आपल्या पाल्याला कपडे, शैक्षणिक साहित्य घेणे शक्य नसले तरी ग्रामीण भगाातील पालक आपल्या कष्टातील पैसा मुलांच्या शिक्षणावर खर्च करण्यात पुढे असतात. शासनाच्या या सुविधेचा लाभ शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी मिळत नसल्याने पालकांकडून नाराजी व्यक्त केली जाते.प्राथमिक शाळांतील मुलांना देण्यात येणाºया गणवेश प्रक्रि येत यावर्षीपासून बदल झाला आहे. या बदल प्रक्रि येमुळेच मुलांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास विलंब लागला आहे.- शैलजा दराडे, जिल्हा शिक्षण अधिकारी अलिबाग

टॅग्स :SchoolशाळाEducation Sectorशिक्षण क्षेत्र