शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेचे आज पारितोषिक वितरण, निरुपणकार पद्मश्री डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांची उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 03:42 IST

अलिबाग : लोकमत आणि रायगड पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने, बँक आॅफ इंडिया व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या सहयोगाने आयोजित ‘रायगड जिल्हा सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा-२०१७’ चा पारितोषिक वितरण समारंभ गुरुवारी २८ सप्टेंबर रोजी येथील पीएनपी नाट्यगृहात ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रायगडचे जिल्हाधिकारी ...

अलिबाग : लोकमत आणि रायगड पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने, बँक आॅफ इंडिया व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या सहयोगाने आयोजित ‘रायगड जिल्हा सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा-२०१७’ चा पारितोषिक वितरण समारंभ गुरुवारी २८ सप्टेंबर रोजी येथील पीएनपी नाट्यगृहात ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रायगडचे जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी हे राहणार असल्याची माहिती रायगडचे जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी दिली आहे.या वेळी निरुपणकार सचिन धर्माधिकारी व उमेश धर्माधिकारी, नगराध्यक्ष प्रशांत नाईक, मुंबई लोकमतचे कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर, लोकमत मीडिया प्रा.लि.चे उपाध्यक्ष विजय शुक्ला, बँक आॅफ इंडियाचे रायगड झोनल मॅनेजर विमल राजपूत, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे जनसंपर्क अधिकारी संजय भुस्कुटे आदी उपस्थित राहाणार आहेत.जिल्ह्यातील २७४ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे या स्पर्धेत सहभागी झाली होती. प्रत्येक तालुकास्तरावर तीन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची निवड तज्ज्ञ परीक्षकांच्या परीक्षण मंडळांच्या माध्यमातून केली होती. त्यातून जिल्हास्तरावर एकूण ११ सर्वोत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची तज्ज्ञ परीक्षकांच्या परीक्षण मंडळांच्या माध्यमातून पारितोषिकांकरिता निवड करण्यात आली आहे. पारितोषिके कोणाला मिळणार याबाबत गणेशोत्सव मंडळ पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यातील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.कार्यक्रमाची जय्यत तयारीपीएनपी नाट्यगृहात गुरुवारी सकाळी ११ वाजता होणाºया सोहळ््याच्या तयारीकरिता पोलीस उपअधीक्षक (गृह) राजेंद्र दंडाळे यांच्या नेतृत्वाखाली अलिबागचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे, जिल्हा वाहतूक पोलीस शाखा प्रमुख मनोज म्हात्रे यांच्या चमूने जय्यत तयारी केली आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी बुधवारी दुपारी चार वाजता पीएनपी नाट्यगृहात येवून तेथील तयारीची जातीने पाहणी केली. यावेळी अलिबागचे नगराध्यक्ष तथा पीएमपी नाट्यगृहाचे पदाधिकारी प्रशांत नाईक, पीएनपीचे जनसंपर्क अधिकारी अमोल नाईक,पोलीस उप अधीक्षक (गृह) राजेंद्र दंडाळे,अलिबागचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे, जिल्हा वाहतूक पोलीस शाखा प्रमुख मनोज म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.वाहतूक पोलीस अधिकारी, कर्मचाºयांचाही होणार गौरवगोवा राष्ट्रीय महामार्ग दुरवस्थेत असतानाही गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात रवाना झालेल्या व परतलेल्या सुमारे ६ लाख वाहनांच्या गोवा महामार्गावरील वाहतुकीदरम्यान वाहतूककोंडी आणि वाहन अपघात होवू न देता विनावाहतूककोंडी वाहतूक सुरळीत ठेवण्यात यशस्वी वाहतूक पोलीस शाखेतील ११ पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांचा प्रातिनिधिक गौरव यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.