शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कुंभार समाज आज धडकणार विधानभवनावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 07:28 IST

महाराष्ट्र कुंभार समाज महासंघ (रजि.) यांच्या नेतृत्वाखाली कुंभार समाजाच्या विविध मागण्यांसाठी विधानभवनावर ५ मार्च रोजी भव्य मोर्चा निघणार असून, त्या निमित्ताने जनजागृती व वातावरण निर्मितीसाठी म्हसळा तालुका कुंभार समाजाच्या वतीने समाजाचे अध्यक्ष सुनील अंजर्लेकर यांच्या नेतृत्वाखाली म्हसळा कुंभारआळी समाजमंदिर ते संपूर्ण म्हसळा शहर जनजागृती मोर्चा काढण्यात आला.

म्हसळा - महाराष्ट्र कुंभार समाज महासंघ (रजि.) यांच्या नेतृत्वाखाली कुंभार समाजाच्या विविध मागण्यांसाठी विधानभवनावर ५ मार्च रोजी भव्य मोर्चा निघणार असून, त्या निमित्ताने जनजागृती व वातावरण निर्मितीसाठी म्हसळा तालुका कुंभार समाजाच्या वतीने समाजाचे अध्यक्ष सुनील अंजर्लेकर यांच्या नेतृत्वाखाली म्हसळा कुंभारआळी समाजमंदिर ते संपूर्ण म्हसळा शहर जनजागृती मोर्चा काढण्यात आला.प्रमुख मागण्यांमध्ये कुंभार समाजासाठी संत गोरोबाकाका माती कला बोर्डची स्थापना करणे, कुंभार समाजाचा एन.टी.मध्ये समावेश व्हावा, उस्मानाबाद जिल्ह्यातील संत गोरोबाकाका यांचे जन्मस्थान तेर ढोकी या तीर्थक्षेत्रास ‘अ’ दर्जा मिळावा, कुंभार समाजास विधान परिषदेत प्रतिनिधत्व मिळावे, मातीवर आकारली जाणारी रॉयल्टी संपूर्णपणे माफ करावी, माती वाहतूक व वीटभट्टी परवान्याच्या जाचक अटी रद्द करण्यात येऊन कुंभार समाजास ओळखपत्रावर परवाना मिळावा, कुंभार समाजासाठी राखीव असणाºया कुंभार खाणीवरील अतिक्र मणे दूर करावीत, समाजासाठी विटा, मूर्ती, मडकी आदी माल विक्रीसाठी ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका हद्दीत अग्रक्रमाने जागा उपलब्ध करून द्याव्यात, मालाच्या उत्पादनासाठी शासकीय जागा उपलब्ध करून द्याव्यात, समाजातील ६० वर्षांवरील कारागिरास मानधन मिळावे, समाजातील विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र वसतिगृहाची उभारणी करावी, अशा विविध मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधण्यात येणार असल्याचे समाजाचे अध्यक्ष सुनील अंजर्लेकर यांनी सांगितले. याप्रसंगी नगराध्यक्षा कविता बोरकर, श्रीवर्धन म्हसळा कुंभार समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रवीण शिरकर, उपाध्यक्ष अनंत पालकर, सचिव गणेश इवलेकर, रायगड जिल्हा युवक कार्याध्यक्ष महेश करंजकर, पाभरे कुंभार समाज अध्यक्ष जनार्दन गोविलकर आदी मान्यवर उपस्थित होते. ५ मार्च रोजी विधानभवनावर काढण्यात येणाºया या महामोर्चात श्रीवर्धन-म्हसळा तालुक्यातील जास्तीत जास्त समाजबांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन रायगड जिल्हा कुंभार समाज खजिनदार सुनील अंजर्लेकर यांनी केले. 

टॅग्स :Raigadरायगडnewsबातम्या