शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

रोहा तालुक्यातील रस्त्यांची चाळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 23:13 IST

खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त : ग्रामीण भागात पावसामुळे चिखलाचे साम्राज्य; अपघाताची शक्यता

- मिलिंद अष्टिवकर रोहा : तालुक्यात पावसामुळे अनेक रस्त्यावर खड्डे पडले आहेत, यामुळे छोटे-मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या खड्ड्यांमुळे रस्त्यावरून वाहन जाताना पादचाऱ्यांच्या अंगावर पाणी उडत असून यामुळे अनेक वेळा वादावादी होण्याच्या घटना घडत आहेत. परिणामी नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. तर रोहा तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची देखील दुरवस्था झाल्यामुळे गावातून शहरात कामासाठी येणाºया ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.रोहे शहर परिसरात आणि लगतच्या ग्रामपंचायतींमध्ये रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. खड्ड्यातील रस्ता शोधत मार्गक्रमण करावे लागत आहे, खड्डे चुकवत वाहन चालवताना अनेक छोटे मोठे अपघात होत आहेत. रोहा- कोलाड रस्ता, रोहा- चणेरा, नागोठणे, अलिबाग, भालगाव या रस्त्यांवर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. रोहा शहरातील मोठ्या वर्दळीचा असलेल्या नाना शंकर शेठ मार्ग, रोहा अष्टमी नगरपरिषदेने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून स्वत:कडे वर्ग करून घेतलेला मुख्य हमरस्ता, म्हाडा वसाहत, एसटी डेपो आणि रोहा तहसील कार्यालय, अष्टमी आदि मार्गांवर सर्वच ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. मुख्य हमरस्त्यावर दमखाडी सातमुशी मोरी लगत निर्माण झालेल्या मोठ्या डबक्यामुळे नागरिक, वाहन चालक हैराण झाले आहेत. म्हाडा वसाहतीत तर रस्ताच अस्तित्वास नसल्याने येथील नागरिकांना चिखलातून मार्गक्रमण करावे लागत आहे. शहरातील यासर्व महत्त्वाच्या रस्त्यांची पार दुरवस्था झाली आहे.दुसरीक डे ग्रामीण भागात चिखलाचे आणि खड्ड्याचे साम्राज्य पसरलेले दिसून येते, अनेक ठिकाणी खड्ड्यांमुळे रस्त्यांना तलावाचे स्वरूप आले आहे. नव्याने झालेले पेपरमिल ते उडदवणे रस्ता सुस्थितीत असला तरी पुढील देवकान्हे ते चिल्हे रस्त्याची अवस्था भयावह झाली आहे. यामार्गावर दररोज अपघात होत आहेत. तांबडी मार्गावर ही रस्त्यावर काही ठिकाणी खड्डे पडलेले असून या मार्गावर दिशादर्शक, सूचना फलक नसल्याने तसेच जंगलभाग, वेडीवाकडी वळणे आणि अरुंद रस्ते असल्याने अनेक छोटे मोठे अपघात येथे होत आहेत. रोहा तालुका आणि शहरात अनेक ठिकाणी रस्ते खड्ड्यांत गेलेले आहेत, या जीवघेण्या खड्ड्यांमुळे रोहेकर त्रस्त झाले आहेत. रोहा अष्टमी नगरपालिका ,जिल्हा परिषद बांधकाम विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आदि प्रशासनाने याकडे दुर्लक्ष न करता गांभीर्याने तात्काळ रस्त्यांची डागडुजी करावी अशी नागरिकांची मागणी आहे.शहरातील खड्डे भरण्याच्या सूचना ठेकेदाराला देण्यात आल्या आहेत. ठेकेदाराने खड्डे सिमेंट काँक्रीटने भरणे, खड्ड्यांची पूर्ण डागडुजी करायची आहे, त्यांच्याकडून सोमवारी लेखी माहिती घेण्यात येईल, ते कामचुकारपणा करीत असतील तर त्यांना नोटीस बजावण्यात येईल.- बाळासाहेब चव्हाण,मुख्याधिकारी, नगरपालिका, रोहातालुक्यातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे छोटे मोठे अपघात होऊन नागरिक जखमी होण्याचे, प्रवाशांना दुखापत होण्याचे प्रकार घडत आहेत. मुसळधार पावसात खड्डे वाचविताना मोठी दुर्घटना होण्याची भीती आहे.- राजेंद्र जाधव,सामाजिक कार्यकर्ते, रोहानगरपालिकेला शहरातील खड्डे भरणे शक्य होत नसेल तर तसे स्पष्ट करावे, रोहा तालुका सिटीजन्स फोरमच्या माध्यमातून नागरिक हे खड्डे भरतील, रोहा-अष्टमीकर जनतेला खड्ड्यांचा खूपच त्रास होत आहे. तरी नगरपालिकेने स्वत: तरी खड्डे भरावेत अथवा आम्हाला अनुमती द्यावी, आम्ही ते भरू, फक्त खड्डे भरल्यावर त्यांची बिले ठेकेदाराकडून पालिकेत जावू नयेत याची खबरदारी त्यांनी घ्यावी.- आप्पा देशमुख, निमंत्रक रोहा ता. सिटीजन्स फोरम