शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

नेरळ-खांडा मार्गावरील खड्डे स्वखर्चाने भरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2019 00:07 IST

नेरळ-खांडा या भागातील रस्त्याचे काँक्रीटीकरण अपूर्ण असल्याने चालकांसह पादचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत होता.

नेरळ : नेरळ-खांडा या भागातील रस्त्याचे काँक्रीटीकरण अपूर्ण असल्याने चालकांसह पादचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. मात्र हे काम पूर्ण करण्याकडे जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून टाळाटाळ करण्यात येत होती. अखेर येथील ग्रामस्थ सुभाष नाईक यांनी स्वखर्चाने रस्त्यावरील खड्डे भरले आहेत. यामुळे नाईक यांचे परिसरात कौतुक होत आहे.मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने सुमारे २२.५० कोटी एवढा निधी नेरळला दिल्याने शहरातील रस्त्यांच्या कामांना सुरवात झाली. रस्त्यासाठीचा निधी एमएमआरडीएने जिल्हा परिषद रायगडकडे वर्ग करून या कामाची जबाबदारी जिल्हा परिषदेने घेतली. रस्त्याच्या कामांना सुरवात झाल्यावर आता नेरळमधील रस्ते चकाचक होणार या आशेने नेरळकर सुखावले होते मात्र नेरळ रेल्वे स्टेशन ते खांडा रस्त्याचे काम रेंगाळले. ठेकेदाराने हे काम अपूर्ण ठेवून दुसºया ठिकाणच्या कामाला सुरुवात केली. अपूर्ण कामामुळे चालक तसेच नागरिकांना अडचणी येत होत्या. खड्डे चुकविण्याच्या नादात अनेक वेळा अपघातही झाले आहेत.याबाबत ग्रामस्थांमधून जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे पाठपुरावा केला, मात्र खड्डे बुजवण्याची तसदी घेण्यात आली नाही. त्यामुळे व्यथित होऊन येथील ग्रामस्थ सुभाष नाईक यांनी स्वत:कडील १००० खर्च करून रस्त्यावरील खड्डे बुजवले.