शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
2
स्कुबा डायव्हिंग करताना ५२ वर्षीय प्रसिद्ध गायकाचा मृत्यू, चाहत्यांना मोठा धक्का
3
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
4
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
5
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
6
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
7
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
8
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
9
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
10
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
11
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
12
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
13
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
14
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
15
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
16
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
17
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
18
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
19
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
20
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती

सोशल मीडियाचा सकारात्मक वापर

By admin | Updated: May 9, 2016 02:27 IST

अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी ‘आपण सारे’ या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपने आजवर अनेकांचे प्राण वाचवले असून, हा आदर्श उपक्रम आहे

खालापूर : अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी ‘आपण सारे’ या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपने आजवर अनेकांचे प्राण वाचवले असून, हा आदर्श उपक्रम आहे. सोशल मीडियाचा होत असलेला सकारात्मक वापर आदर्श निर्माण करीत आहे, असे प्रतिपादन खालापूर तालुक्याचे तहसीलदार अजित नैराळे यांनी केले.गेल्या ५२ दिवसांत विविध कारणाने खोपोली परिसरात पाच तरुणांना मोटारसायकल अपघातात जीव गमवावा लागला असून, जखमी होण्याचे प्रकारही वाढले आहेत. या गंभीर समस्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी व अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी या ग्रुपने खोपोलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील पटांगणात तरुणाई नव्हे, तर संपूर्ण समाजाला प्रेरक असा प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्तेच नव्हे तर शहरातील नामांकित व्यक्ती या कार्यक्रमासाठी एकत्र आल्या होत्या. गेले आठवडाभर अनेक माध्यमांतून या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाची चर्चा होती. महामार्गावरून अत्यंत महागड्या किमतीच्या दुर्मीळ मोटारसायकलस्वार प्रवास करण्याचा छंद जोपासत असतात. त्यांचे अनुकरण करीत धूमस्टाईल मोटारसायकल चालवणारे तरुण अपघातात सापडत आहेत. हे लक्षात घेऊनच या कार्यक्रमात आम्ही मोटारसायकल रायडिंगचा आनंद घेताना सुरक्षेची कोणती साधने वापरतो आणि ती कशी आवश्यक आहेत, याची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. खूप स्वस्तातली सुरक्षारक्षक साधने आपण वापरत नसल्याने एवढेच नव्हे, तर साधे हेल्मेट न वापरल्याने मोलाचा जीव गमावून बसतो. असे यापुढे कोणाच्या बाबतीत घडू नये, यासाठी उपस्थितांकडून शपथ घेण्यात आली.या कार्यक्रमाच्या निमित्ताने खोपोली शहर आणि खालापूर तालुक्यातून अनेक तरुण व पालक यावेळी आवर्जून उपस्थित होते. अत्यंत साधेपणाने कोणताही अवाजवी खर्च व स्वागत किंवा आभाराची औपचारिकता पार न पाडता फक्त अपघातात कशी मदत करावी, सुरक्षिततेची साधने कशी वापरावीत व अपघातांचे प्रमाण कसे घटवता येईल, या बाबींकडे लक्ष दिले गेले. या व अशा उपक्रमांतून समाजातल्या नीतिमूल्यांची जाणीव तर होतेच किंबहुना आपण कुठेतरी कमी पडत आहोत, आपल्याही समाजसेवेसाठी दोन पावले पुढे ठेवली पाहिजेत, अशी प्रेरणा मिळते. असे सांगताना वाहने नियमाने चालवावीत, अल्पवयीन मुलांच्या हातात पालकांनी वाहने देऊ नयेत, अपघातात मदतीला हयगय करू नका, असो मार्गदर्शनवजा सल्ला अजित नैराळे यांनी दिला.हनुमान मंडळाचे राजेंद्र फक्के, नरेंद्र गायकवाड, किशोर पाटील, सुजाता जाधव यांनी आपल्या भावना प्रकट केल्या. जगदीश मरागजे यांनी सूत्रसंचालन केले, तर ग्रुपचे गुरुनाथ साठेलकर यांनी प्रास्ताविक केले.