शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
2
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
3
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
4
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
5
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
6
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
7
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
8
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
9
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
10
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
11
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
12
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
13
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
14
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
15
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
16
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
17
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
18
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
19
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
20
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

भाताच्या रोपवाटिकांना प्रतीक्षा दमदार पावसाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 00:36 IST

रोपे करपण्याची भीती; पेणमधील शेतकरी चिंताग्रस्त

पेण : जून महिना निम्म्याहून अधिक संपला तरी मान्सून सक्रिय झालेला नाही. पूर्व मोसमी पावसाच्या हलक्या सरी पडून अंकुरलेल्या भात रोपांना आता दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. दिवसा पडणाऱ्या कडक उन्हात पाण्याअभावी या रोपवाटिकामधील रोपे करपण्याची शक्यता शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.पेणमधील खारभूमी क्षेत्रात ६५७८ हेक्टर क्षेत्रावर ही समस्या उद्भवली आहे. या जमिनीत उगवण झालेल्या नर्सरी रोपांची अवस्था पाण्याअभावी गंभीर बनली आहे. सतत पावसात रोपे टिकाव धरतात, असे असताना मान्सून लांबल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. पेणमध्ये लागोपाठ तीन-चार दिवस पूर्वमोसमी पावसाच्या सरी कोसळल्याने धूळपेरणी केलेले भाताला अंकुर फुटले आहेत. उबदार तापलेल्या जमिनीत पावसाच्या सरींचा शिडकाव होताच ही रोपे उगवतात. मात्र, त्यानंतरही पाऊस गायब झाला आणि कडक उन्हाचा सामना रोपांना करावा लागत आहे. सध्या अधूनमधून एखादी सर पडते, तेवढ्या आधारावर ही रोपे तग धरून उभी आहेत. येत्या दोन दिवसांत पाऊस सुरू न झाल्यास परिस्थिती गंभीर होऊन शेतकºयांना पीक तुटवड्याच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे.पेणमधील १३ हजार १०० हेक्टर क्षेत्रावर भात रोपलागवड झाली आहे. सर्व क्षेत्रात चांगली रोपे उगवली असून दमदार पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे. शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात जादा पैसे मोजून बी-बियाणांची खरेदी केली आहे. त्यामुळे मान्सून अधिक काळ लांबल्यास शेती व शेतकºयांचे आर्थिक गणित बिघडण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Rainपाऊस