शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

उरण परिसरातील प्रदूषणाची समस्या गंभीर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभागाचे दुर्लक्ष 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2020 01:00 IST

Uran : विकासकामांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात समुद्र, खाड्या किनारी आणि मोकळ्या परिसरात झालेल्या प्रचंड दगड-मातीच्या भरावामुळे पर्यावरणाची प्रचंड हानी झाली आहे.

उरण : उरण परिसरातील वाढते औद्योगिकीकरण, प्रचंड प्रमाणात होत असलेले मातीचे भराव, मॅन्ग्रोव्हजची होणारी प्रचंड वृक्षतोड, उरण-पनवेल मार्गावरील डोंगर कपारीत चालणाऱ्या धूळ फेकणाऱ्या दगडखाणी आणि रासायनिक घातक प्रकल्पांमुळे येथील पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास झाला आहे. मात्र त्याकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभागाचे दुर्लक्ष झाले आहे.उरण परिसरात प्रचंड औद्योगिकीकरण सुरू आहे. अत्याधुनिक जेएनपीटी, इतर खासगी बंदरांमुळे विविध प्रकारच्या कंपन्या, रासायनिक प्रकल्प, कंटेनर व इतर माल साठवणुकीची शेकडो गोदामे उभारण्यात आली आहेत. विकासकामांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात समुद्र, खाड्या किनारी आणि मोकळ्या परिसरात झालेल्या प्रचंड दगड-मातीच्या भरावामुळे पर्यावरणाची प्रचंड हानी झाली आहे. समुद्र, खाड्या, जलाशयांत झालेल्या प्रचंंड दगड-मातीच्या भरावामुळे समुद्राची पातळी मोठ्या प्रमाणात वाढल्याने गावांसभोवार असलेले बांध-बंदिस्ती उद्ध्वस्त करून समुद्राचे पाणी गावागावात शिरू लागले आहे.नवी मुंबई सेझ, जेएनपीटी सेझ प्रकल्पांसाठी झालेल्या भरावामुळे तर गावांपासून समुद्र, खाड्यांपर्यत पावसाळी पाण्याचा निचरा करणारे नैसर्गिक नाले बुजले गेले आहेत. त्यामुळे पाण्याचा निचरा होत नसल्याने ठिकठिकाणी पाणी साचून नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय परिसरातील प्रचंड दगड-मातीच्या भरावामुळे स्थलांतरित आणि विविध स्थानिक जलचर पक्ष्यांची वास्तव्याची ठिकाणे नष्ट झाली आहेत. भरावासाठी डोंगर, टेकड्या भुईसपाट करण्यात आल्या आहेत. यामुळे परिसरातील पशू-पक्ष्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटले आहे. परिसरात उभारण्यात आलेल्या धोकादायक तसेच अत्यंत ज्वालाग्राही रासायनिक प्रकल्पांमुळे रासायनिक दूषित पाणी समुद्रात आणि खाड्यांत मिसळत आहे. त्यावर पर्यावरण खात्याचे फारसे नियंत्रणच नसल्याने जल, वायुप्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

पारंपरिक मासेमारीही आली धोक्यात वाढत्या जलप्रदूषणामुळे पारंपरिक मासेमारीही धोक्यात आली आहे. त्याचप्रमाणे विविध प्रकल्पांच्या उभारणीसाठी दुर्मीळ मॅन्ग्रोव्हज झाडांची बेसुमार वृक्षतोड करण्यात आली आहे. उरण-पनवेल मार्गावरील डोंगर कपारीत चालणाऱ्या धूळ फेकणाऱ्या दगडखाणी आणि क्वाऱ्या दिवसरात्र सुरू आहेत. यामुळे हवेत उडणाऱ्या धुरळ्याने परिसर व्यापून जात आहे. त्यामुळे वाहनचालकांना वाहने चालविणेही कठीण होते. नाकातोंडात धूळ जात असल्याने आरोग्याशी खेळ सुरू आहे.

टॅग्स :pollutionप्रदूषण