शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

तळोजा औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषणाचा मुद्दा हिवाळी अधिवेशनात

By वैभव गायकर | Updated: December 20, 2023 21:02 IST

दुषित वायू सोडणाऱ्या कारखान्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी

वैभव गायकर, लोकमत न्युज नेटवर्क, पनवेल: तळोजा औद्योगिक वसाहतीमधील अनेक कारखान्यांतून होणाऱ्या रासायनिक वायू प्रदूषणाबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे शासनाचे लक्ष वेधले. तसेच दुषित वायु सोडणाऱ्या कारखान्यांवर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली. आमदार प्रशांत ठाकूर यांनी लक्षवेधी सूचनेत म्हंटले आहे.

औद्योगिक वसाहतीतील अनेक कंपन्यांमार्फत रात्री अपरात्री तसेच पहाटेच्या वेळीत सोडण्यात येणाऱ्या रासायनिक दुषित वायुमुळे पनवेल, नवीन पनवेल, खांदा कॉलनी, कळंबोली, कामोठे, खारघर परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असल्याचे निदर्शनास आले असल्याची बाब आमदार ठाकुर यांनी सभागृहात मांडली.त्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण करणाऱ्या या औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कारखान्यांवर कोणतीच कारवाई होत नसल्यामुळे नागरिकांच्या मनात संबंधित विभागाबाबत चिड निर्माण झाली असून या औद्योगिक वसाहतीच्या परिसरातील खारघर, कळंबोली, तळोजा आणि पनवेल परिसरातील अनेक नागरिक आपली घरे सोडून अन्यत्र स्थलांतर होत असून  प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांची सदर प्रदुषण करणाऱ्या कारखान्यांच्या बरोबर साटेलोट असल्याची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे दुषित वायु सोडणाऱ्या कारखान्यांवर तसेच या परिसरातील संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची नितांत गरज असून याबाबत शासनाने तातडीने कार्यवाही व उपाययोजना करावी अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रदूषणाच्या लक्षवेधीवर उत्तर देताना म्हटले आहे कि ;हिवाळ्यात रात्रीच्यावेळी तापमानात होणारी घट यामुळे उत्सर्जित वायुंचे विसर्जन होण्यास अडथळा निर्माण होत असल्याने नजीकच्या परिसरात रासायनिक वास पहाटेच्यावेळी काहीवेळा जाणवल्याचे या कार्यालयाच्या रात्रीच्या गस्ती दरम्यान निदर्शनास आले आहे.  तक्रारीच्या अनुषंगाने सेंट्रलपार्क सेक्टर-२१, खारघर येथे मोबाईल एअर मॉनिटरींग व्हॅन व्दारे हवेची गुणवत्ता मोजण्याचे काम ०६ डिसेंबर  पासून ते आजपर्यंत चालू आहे, या अहवालावरून हवेच्या गुणवत्तेमध्ये केमिकल घटकांचे प्रमाण विहित मर्यादेत असल्याचे तसेच हवा गुणवत्ता निर्देशांक हा "मध्यम" स्वरुपाचे असल्याचे निदर्शनास आले असल्याचे आपल्या उत्तरात म्हटले आहे.

लहान मुलांच्या वाढीवर परिणाम नाही

पनवेल महानगरपालिका व तसेच वैद्यकीय अधिक्षक उप जिल्हा रुग्णालय, पनवेल यांच्याकडून नजीकच्या रहिवाश्यांच्या आरोग्यावर झालेल्या परिणामाबाबतचा अहवाल मागविला होता. त्यांच्या अहवालानुसार तळोजा औद्योगिक वसाहतीतून निर्माण होणारे वायू व जल प्रदुषणामुळे सभोवतालच्या परिसरातील रहिवासी संकुल क्षेत्रातील लहान मुले प्रदुषणामुळे मृत होणे, लहान मुलांच्या वाढीवर परिणाम होणे या बाबतची नोंद रुग्णालयातील अहवालानुसार दिसून येत नाही असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :panvelपनवेलpollutionप्रदूषण