शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
19
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
20
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच

पनवेल तालुक्यात 186 जागांसाठी आज मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 00:30 IST

३९० उमेदवार आहेत रिंगणात : ९४ केंद्रांवर होणार मतदान

वैभव गायकरलोकमत न्यूज नेटवर्कपनवेल  : पनवेल तालुक्यात शुक्रवारी १८६ जागांसाठी मतदान होणार आहे. २४ पैकी दोन बिनविरोध झाल्याने २२ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  उपाययोजना राबवून या निवडणुका पार पडत आहेत. निवडणुकीत भाजप, सेना, कॉँग्रेस, शेकाप, राष्ट्रवादी ,मनसे आदी पक्षासह स्थानिक गावविकास आघाड्या रिंगणात उतरल्या आहेत.  

वाढते शहरीकरण लक्षात घेता ग्रामपंचायतीमध्ये आपले वर्चस्व असावे या हेतूने मातब्बर मंडळी रिंगणात उतरली आहेत. याकरिता मतदारांना आमिषे दाखविण्याचे प्रकार सुरू आहेत.काही ग्रामस्थांनी गावातील वाद, तंटे मिटविण्याच्या दृष्टीने ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला; मात्र अनेकांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणुकीत उतरलेल्या ३९० जणांचे नशीब मतपेटीत आज बंदिस्त होणार आहे. चोख बंदोबस्तात ही निवडणूक पार पडत आहे.याकरिता सुमारे ७५० पोलीस बंदोबस्तासाठी ठेवण्यात आले आहेत.

पोलीस बंदोबस्तग्रामपंचायत निवडणुकीत सर्व ९४ मतदार केंद्रांवर पोलिसांचा चोख बंदोबस्त असणार आहे. याकरिता ७५० पोलीस नेमण्यात आले आहेत. पनवेलमध्ये संवेदनशील पाच गावे असून याठिकाणी पोलीस बंदोबस्तासह  पेट्रोलिंगची गस्त वाढविण्यात येणार असल्याची माहिती परिमंडळ दोनचे उपायुक्त शिवराज पाटील यांनी दिली आहे. 

नियमांचे पालन करावेराज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार खबरदारी घेऊन मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. २२ ग्रामपंचायतीत १८६ जागांसाठी ही निवडणूक पार पाडली जाणार आहे.याकरिता प्रशासन सज्ज झाले आहे. मतदारांनी मतदान केंद्रावर येताना मास्क घालावे तसेच सोशल डिस्टसिंगचे पालन करावे.- विजय तळेकर, निवडणूक निर्णय अधिकारी,  पनवेल

थर्मल स्कॅनिंग करूनच प्रवेशकोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदार केंद्रावर आशासेविका उपस्थित राहणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सर्व काळजी घेण्यात येणार आहे. 

थर्मल स्कॅनिंग,सॅनिटायझर करूनच मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती तहसीलदार विजय तळेकर यांनी दिली.

निकाल १८ तारखेलाया ग्रामपंचायतीचा निकाल १८ तारखेला लागणार आहे. पनवेल शहरातील व्ही. के. हायस्कूलमध्ये मतमोजणी पार पडणार आहे.

पाच संवेदनशील गावे२२ ग्रामपंचायतींत पाच  संवेदनशील गावे आहेत. येथे मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात इतर परिसरापेक्षा बंदोबस्त जास्त ठेवला गेला आहे. 

५५,२७९एकूण मतदारस्त्री : २६०९१ पुरुष :२९२०५ 

 

टॅग्स :Raigadरायगडpanvelपनवेल