शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गणेश मंडळांवर पोलिसांची करडी नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 02:17 IST

गणेशोत्सव कालावधीत डीजेचा आवाज दाबण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. त्याचबरोबर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी विविध गणेश मंडळांना ताकीद दिली आहे.

अलिबाग : गणेशोत्सव कालावधीत डीजेचा आवाज दाबण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. त्याचबरोबर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी विविध गणेश मंडळांना ताकीद दिली आहे. त्यामुळे कायदा मोडणाºया गणेश मंडळांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे.२५ आॅगस्टपासून गणेशोत्सवाला सुरु वात होणार आहे. त्यामुळे विविध गणेश मंडळांची लगबग सुरु झाली आहे. दुसरीकडे गणेशोत्सव शांततेत पार पडावा यासाठी पोलिसांनी विविध मंडळांच्या पदाधिकाºयांबरोबरच बैठका घेण्यास सुरु वात केली आहे. अलिबाग पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी शहरातील विविध गणेश मंडळांना सूचना दिल्या आहेत. पोलीस निरीक्षकांनी ध्वनिप्रदूषण आणि जलप्रदूषण रोखण्यासाठी गणेश मंडळांना आवाहन करून चांगले सहकार्य करणाºया मंडळांचा रायगड पोलिसांमार्फत गौरव करण्यात येणार असल्याची माहिती अलिबाग पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी दिली.डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे ध्वनिप्रदूषण होते. त्यामुळे अनेक गंभीर परिणामांसह उच्च रक्तदाब, कायमचा बहिरेपणा तसेच वृद्ध व लहान मुलांना त्याचा त्रास होतो. त्यामुळे शहरातील डीजे चालकांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार ध्वनिप्रक्षेपक ठरवून दिलेल्या मर्यादेत वाजविणे गरजेचे असल्याचे वराडे यांनी सांगितले. डीजेच्या ध्वनिप्रदूषणावर अंकुश लावण्यासाठी पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व डीजे चालकांना ध्वनिप्रदूषण रोखण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच ध्वनिप्रदूषण करू नये व नियमाप्रमाणे आवाज मर्यादेचे उल्लंघन करू नये. यासाठी सीआरपीसी कलमानुसार प्रतिबंधक नोटीस देण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.गणेश मंडळांनी डी.जे. वाजवून ध्वनिप्रदूषणाचे उल्लंघन केल्यास ध्वनिप्रदूषण अधिनियम २००० कायद्यान्वये कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. पाच वर्षांपर्यंत कैद व एक लाख रु पये दंड किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद आहे. म्हणून ध्वनिप्रदूषणाचे नियम पाळून पारंपरिक वाद्य नियमांच्या अधीन राहून वाजवावेत आणि पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन वराडे यांनी केले.