शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

पार्ट्यांवर पोलिसांची नजर; लिंक शोधण्याचा रायगड पोलिसांचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 23:39 IST

ड्रग्स पेडलर्स रडारवर : लिंक शोधण्याचा रायगड पोलिसांचा प्रयत्न

निखिल म्हात्रेअलिबाग : कोरोनानंतरचे नवे पर्व आणि नव्या वर्षाचे स्वागत जल्लोषात करण्यासाठी अनेक जण तयारी करीत असताना या संधीचा आर्थिक फायदा घेण्यासाठी मुंबईतील काही ड्रग्स पेडलर्स रायगड जिल्ह्यात आपले हातपाय पसरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. 

रायगडपोलिसांनी यासाठी तीन स्तरावर कोंबिंग ऑपरेशन सुरू केले आहे. २० दिवसांपूर्वी दिव-दमन येथून मद्याची बेकायदा वाहतूक करणाऱ्या पनवेल आणि अलिबागमध्ये एकूण चार जणांना अटक केल्यानंतर अमली पदार्थ आणि मद्याचा साठा करणाऱ्यांवर रायगड पोलिसांची बारिक नजर असल्याचे दिसून येत आहे. मुंबईतील अनेक सिनेस्टार, व्यावसायिकांचे फार्म हाउसेस, रायगड जिल्ह्यात आहेत. या धनाढ्य लोकांकडून अमली पदार्थांना मागणी जास्त असते.

मुंबईतील सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणानंतर अंमली पदार्थांविरोधात नार्कोटिक्स विभागाने अनेक कलाकारांसह त्यांना अमली पदार्थ पुरवणाऱ्यांवर कारवाई केलेली आहे. त्यामुळे मुंबईतील धास्तावलेले ड्रग्स पेडलर रायगड जिल्ह्यात आपले बस्तान मांडू शकतात, अशा संशय रायगड पोलिसांना आहे. त्या अनुषंगाने खालापूर येथे केलेल्या जुगार अड्ड्यावरील कारवाईला महत्त्व आले आहे

नवे वर्ष सुरू होण्यास तीन दिवस शिल्लक आहेत, परंतु येथील पर्यटन व्यावसायिकांची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. दरवर्षी रायगडमध्ये होणाऱ्या थर्टीफर्स्टसाठी मद्याचे सेवन, अमली पदार्थांचा वापर सर्रास केला जातो. या वर्षी मुंबई-पुण्यातील पर्यटक दूर न जाता अलिबागमध्ये  पार्ट्या आयोजित करण्याच्या बेतात आहेत. यासाठी बुकिंगही सुरू झाली आहे. नेहमीपेक्षा या वर्षी ग्राहकांच्या मागण्या वेगळ्या असून, वर्षभरातील अनेक चढउतार, आर्थिक मंदी, लॉकडाऊनमुळे आलेला मानसिक ताण घालविण्यासाठी नशेच्या पदार्थांची विचारणा होऊ लागली आहे.

रायगड जिल्ह्यात फक्त नोव्हेंबरमध्ये नशेच्या पदार्थांचा व्यवसाय करोडोंच्या घरातला असतो. चोरी-छुपे चालणाऱ्या या व्यवसायावर पायबंद घालण्यासाठी अनेक उपाययोजना रायगड पोलीस दरवर्षी घालण्याचा प्रयत्न करीत असतात. तरीही ग्राहकांची प्रचंढ मागणी आणि कमी कालावधीत दामदुप्पट नफा मिळत असल्याने, अनेक व्यावसायिक बनावट दारू विकणे, दिव-दमण, गोवा या राज्यातून कमी किमतीत दारू आणून विकणे, चरस-गांजा यासारख्या अमली पदार्थांचा साठा करणे यासारखे प्रकार सुरू केले असून, यावर नियंत्रण आणण्यासाठी रायगड पोलीसकरीत आहेत.

टॅग्स :RaigadरायगडPoliceपोलिस