शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ आरोपींना १७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 05:19 IST

मुंबई-पुणे महामार्गालगत असणाऱ्या विनेगाव येथील बेटर लाइफ व्यसनमुक्ती केंद्रातील अमानुष मारहाण व अत्याचारप्रकरणी संस्थेचे पदाधिकारी प्रदीप भगवानदास पटेल, त्याचा मुलगा मल्हार पटेल यांच्यासह सहा जणांना बुधवारी अटक करण्यात आली होती.

खालापूर : मुंबई-पुणे महामार्गालगत असणाऱ्या विनेगाव येथील बेटर लाइफ व्यसनमुक्ती केंद्रातील अमानुष मारहाण व अत्याचारप्रकरणी संस्थेचे पदाधिकारी प्रदीप भगवानदास पटेल, त्याचा मुलगा मल्हार पटेल यांच्यासह सहा जणांना बुधवारी अटक करण्यात आली होती. खालापूर पोलिसांनी गुरुवारी सर्व आरोपींना स्थानिक न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना १७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.खालापूर विनेगाव येथील मोंटेरिया रिसॉर्टच्या बाजूला असणाºया कृष्णा माई या बंगल्यात मुंबईतील प्रदीप पटेल यांचे कुटुंबीय व्यसनमुक्ती केंद्र चालवतात. या केंद्रात व्यसन सोडवण्यासाठी आलेल्यांना अमानुष मारहाण, सिगारेटचे चटके देणे अशा प्रकारणे छळ करण्यात येत होता. या मारहाणीमुळे हनी नावाचा एक १३ वर्षीय मुलगा बेशुद्ध पडला. त्याची आई आलिषा तेथे मुलाला पाहायला गेली असता, हा प्रकार उघडकीस आला. तिच्या तक्रारीवरून बुधवारी पोलिसांनी या प्रकरणी सहा जणांना अटक केली होती. यातील आरोपी प्रदीप पटेल आणि त्याचा मुलगा मल्हार पटेल यांच्यासह सहा आरोपींना गुरुवारी खालापूर पोलिसांनी स्थानिक न्यायालयात हजर केले असताना न्यायालयाने १७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.व्यसनमुक्ती केंद्रे रडारवरअलिबाग येथील एका व्यसनमुक्ती केंद्रात अशाच प्रकारे अमानुष मारहाण झाल्याचे काही वर्षांपूर्वी उघडकीस आले होते, तर चौकजवळील व्यसनमुक्ती केंद्रातदेखील यापूर्वी अशाच प्रकारे मारहाण व एकाची हत्या झाल्याचे प्रकरण उजेडात आले होते. त्यानंतर विनेगाव येथे घडलेल्या घटनेनंतर आता जिल्ह्यातील सर्वच व्यसनमुक्ती केंद्रे पोलिसांच्या रडारवर आली आहेत. सर्वांचाच तपास करण्यात येणार असल्याचे समजते.अधिक तपास सुरूबेटर लाइफ व्यसनमुक्ती केंद्रातील मारहाण प्रकरणातील अटक आरोपींना पोलीस कोठडी मिळाली आहे. घटनास्थळाची पाहणी करण्यात येत असून अधिक तपास सुरू आहे. गरजेनुसार आणखीही काही जणांची चौकशी करण्यात येईल. परवानगी न घेताच हे केंद्र सुरू होते, असे खालापूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जमील शेख यांनी सांगितले.>लैंगिक अत्याचार झाल्याचा संशयविनेगाव व्यसनमुक्ती केंद्रात पीडितांवर उपचार करताना देण्यात येणाºया औषधांची माहिती पोलीस घेत आहेत. घटनास्थळी काही संशयित औषधे पोलिसांना सापडली आहेत. या ठिकाणी लैंगिक अत्याचारही करण्यात आल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्या दिशेने तपास सुरू असल्याचे खालापूर पोलिसांनी सांगितले; शिवाय आता या संस्थेच्या अन्य पदाधिकाºयांचीदेखील पोलीस चौकशी करणार आहेत.