शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांनी केला लाखो रुपये किंमतीचा गांजा चरस नष्ट 

By निखिल म्हात्रे | Updated: April 16, 2025 18:29 IST

या गुन्ह्यात जप्त करण्यात आलेले ८ लाखाचे अंमली पदार्थ कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करीत तळोजा येथे नष्ट करण्यात आले.

निखिल म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग - रायगड जिल्हा पोलीस हद्दीतील कर्जत, नागोठणे, नेरळ, पोयनाड, मांडवा सागरी, रेवदंडा, महाड, वडखळ, गोरेगाव, रसायनी, मुरुड, खोपोली अशा १२ पोलीस ठाण्यांमध्ये एन.डी.पी.एस. अॅक्ट अंतर्गत १५ गुन्हे दाखल करण्यात आले होते. या गुन्ह्यात जप्त करण्यात आलेले ८ लाखाचे अंमली पदार्थ कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करीत तळोजा येथे नष्ट करण्यात आले.

मागील काही दिवसामध्ये पोलिसांनी कारवाईमध्ये जप्त केलेले एकूण ५२ किलो ३९ ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ, त्यामध्ये ५० किलो ९९२ ग्रॅम गांजा आणि १ किलो ४७ ग्रॅम चरस, ज्याची एकूण किंमत ८ लाख, 48 हजार, 18 रुपये इतकी आहे, तो मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लिमीटेड, तळोजा, नवी मुंबई येथे कायदेशीर प्रक्रिया पार पाडून मंगळवारी (१५ एप्रिल) नष्ट करण्यात आला.

ही कार्यवाही एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ५२ अ (२) नुसार करण्यात आली. यावेळी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे, पोलीस उपअधीक्षक मुख्यालय तथा पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्यासह न्यायवैद्यकीय प्रयोगशाळा, कलीना, मुंबईचे सहायक रासायनिक विश्लेषक अ. स. गावकर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ रायगड क्षेत्र अधिकारी डॉ. गजानन खडकीकर, वैद्यमापन शास्त्र, अलिबाग विभाग रायगड निरीक्षक सुरेश देवकाते तसेच दोन शासकीय पंच उपस्थिती होते.

ही कारवाई अंमली पदार्थ विरोधातील धोरणबद्ध प्रयत्नांचे उदाहरण असून, यामुळे जिल्ह्यातील समाजातील सुरक्षितता आणि कायदा व सुव्यवस्था बळकट होण्यास मदत होणार आहे. - सोमनाथ घार्गे, जिल्हा पोलिस अधिक्षक.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी