शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

पोलादपूर- फोपळयाचा मुरा येथे वऱ्हाडाची गाडी दरीत कोसळून चार जणांचा मृत्यू, 16 जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2018 15:13 IST

पोलादपूर- साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी फोपल्याचा मुरा येथे जात असनाता तीव्र चढावर गाडीचा अपघात झाला आहे. गाडी 30 ते 40 फुट दरीत कोसळून हा अपघात झाला आहे. या अपघातात तीन जण जागीच ठार झाले तर उपचारादरम्यान एका महिलेचा मृत्यु झाला. 16 जण जखमी झाले आहेत. यातील सात ते आठ जणांना उपचारासाठी महाड, ...

पोलादपूर- साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी फोपल्याचा मुरा येथे जात असनाता तीव्र चढावर गाडीचा अपघात झाला आहे. गाडी 30 ते 40 फुट दरीत कोसळून हा अपघात झाला आहे. या अपघातात तीन जण जागीच ठार झाले तर उपचारादरम्यान एका महिलेचा मृत्यु झाला. 16 जण जखमी झाले आहेत. यातील सात ते आठ जणांना उपचारासाठी महाड, माणगाव  येथे पाठविन्यात आले असून काही जखमींना जवळच्या पोलादपुर  ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.सदर घटना बुधवार रात्री सव्वा सातच्या दरम्यान घडली. या अपघातात भिकू तुकाराम मालुसरे रा. अडावळे एरंड वाडी, पांडुरंग धोंडू बीरमणे रा. अडावळे, अनिकेत अनंत सकपाळ रा. पार्टेकोंड, हे जागीच ठार झाले तर उपचारादरम्यान  जीजाबाई केशव पार्टे रा. पार्टेकोंड यांचा मृत्यू झाला. जखमीमध्ये इंदूबाई रामचंद्र पार्टे, वय 65 वर्षे,वनिता बाळाराम पवार वय 55 वर्षे,अरुणा सोनु सकपाळ , सुनीता सखाराम मांढरे,अशोक लक्ष्मण पार्टे,रेणुका भागुराम सकपाळ, कृष्णा बाई गणपत वाडकर, अंकिता सुरेश पार्टे वय 9 वर्षे, सुरेश लक्ष्मण पार्टे वय 49 वर्षे, चिमा बाई बाळाराम वाडकर वय 60 वर्षे,आकाश पार्टे,अमित सुरेश पार्टे वय 15 वर्षे, राजेश्री तुकाराम सकपाळ वय 45 वर्षे, प्रदीप रामचन्द्र पार्टे (चालक) , गणेश सयाजी पार्टे, ममता बाई भीकाजी  पार्टे, मनिषा अशोक पार्टे, सर्व रा. पार्टेकोंड  यांचा समावेश आहे.हा अपघात पोलादपुर पासून 22 km अंतरावर झाला.अडावले ग्रामपंचायतीचे सरपंच सुरेंद्र बांदल यानी ग्रामस्थांच्या सहाय्याने जखमीना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात मदत केली. या अपघाताची माहिती कळताच राजिप माजी उपाध्यक्ष  तथा जिप सदस्य चंद्रकांत कळंबे,तालुकाप्रमुख नीलेश अहिरे, शहरप्रमुख सुरेश पवार, माजी सभापती दिलीप भागवत, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश पवार, पोलीस उपनिरीक्षक अंधेरे व पोलिस कर्मचारी,नगरसेवक, पत्रकार, पार्टेकोंड, पोलादपुर, शहरातील सुजान नागरिक मदतीसाठी धावले, तसेच सरकारी रुग्णालयातील डॉ पाटील मॅडम,डॉ सोनावणे,डॉ सलागरे, डॉ मोराले, तसेच खाजगी दवाखान्यातील डॉ मपारा, डॉ  साळुंके,  यांनी तातडीने जखमी व्यक्तीवर उपचार केले. रुग्णालयासमोर नातेवाईक व ग्रामस्थांचा आक्रोश  पाहून सर्वांचे मन हेलावून जात होते.सर्व वातावरण मन सुन्न करणारे होते.या अपघाताची नोंद पोलादपुर पोलिस ठाण्यात केली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार मिन्डे अधिक तपास करत आहेत.