शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पोलादपूरमध्ये एका रात्रीत ११ घरफोड्या, ६९ हजारांचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2017 06:21 IST

पोलादपूर शहरातील प्रभातनगर परिसरात मुंबई - गोवा महामार्गालगत असणाºया श्री सिद्धीविनायक अपार्टमेंट व शगून अपार्टमेंट व अन्य ठिकाणी बुधवारी रात्री तब्बल ११ बंद घरांमध्ये चोरी झाली.

पोलादपूर : शहरातील प्रभातनगर परिसरात मुंबई - गोवा महामार्गालगत असणा-या श्री सिद्धीविनायक अपार्टमेंट व शगून अपार्टमेंट व अन्य ठिकाणी बुधवारी रात्री तब्बल ११ बंद घरांमध्ये चोरी झाली. चोरट्यांनी ६९ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला असून काही रहिवासी दिवाळीनिमित्त गावी गेले असून चोरीचा मुद्देमालाचा पूर्ण तपशील समजू शकला नाही. मात्र या चोरीच्या घटनेने शहरात सर्वत्र खळबळ उडाली आहे.पोलादपूर शहरातील प्रभातनगर शगून अपार्टमेंट येथील रहिवासी हे गावी गेले असल्याने चोरट्यांनी त्यांचे बंद घरांचे कडीकोयंडे तोडून घरात प्रवेश के ला. कपाट उघडून त्यातील सोन्याच्या तारेत गुंफलेले मनी, ३ अंगठ्या, ४८ लहान मनी, दीड ग्रॅम वजनाचे बदामी पान, सोन्याच्या दोन बांगड्या, दोन कानातील रिंग, कानातील २ टॉप, कर्णफुले आदी सोन्याचे दागिने लंपास केलेआहेत.तसेच शगून अपार्टमेंटमधील रिना राठोड, सिद्धीविनायक अपार्टमेंटमधील राहुल लंगोटे, नीलेश कुंभार, शरद थोरात, प्रकाश इंगवले, रामजानकी अपार्टमेंटमध्ील शीला शिंदे, उमेश जाधव, युवराज जाधव, पवार चाळ येथील अमित सावंत, नानास्मृती अपार्टमेंटमधील पुंडलिक मोरे तसेच रोहिदासनगर येथील मनोहर कापडेकर आदि लोकांच्या बंद घरांचे टाळे तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. वरील सर्वजण दिवाळी सणानिमित्त गावी गेले आहेत.या घटनेची माहिती समजताच सहा. पो. नि. प्रकाश पवार, उपनिरीक्षक अनिल अंधेरे, पीएसआय सकपाळ, पो. ना. नाना म्हात्रे, दीपक जाधव, शिरगावकर, शेख, पिंगळे, सावंत, सावंत, अमित सावंत, आर. एन. जाधव, महाडिक, एएसआय प्रकाश जंगम, मोहिते, सुवर्णा खाडे आदि पोलीस कर्मचाºयांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामे करून वेगाने तपासाची सूत्रे फिरवली आहेत.पोलादपूर शहरात गेल्या दोन वर्षापूर्वी शिवाजीनगर, सैनिक नगर, गाडीतळे व महाबळेश्वर राज्यमार्गावरील घरे व दुकाने फोडून चोरट्यांनी चोरीचा डल्ला मारला आहे. तसेच काही दिवसापूर्वी ग्रामदैवत काळभैरवनाथ मंदिरातील दानपेटी फोडून चोरीची घटना घडली आहे. मात्र यापूर्वी झालेल्या काही चोºयांचा अद्याप छडा न लागल्याने आणि चोरट्यांनी पुन्हा शहरात चोरीचा मोर्चा वळविल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.ग्रामस्थांची उपाययोजनांची मागणीकाही दिवसांपूर्वी ग्रामदैवत काळभैरवनाथ मंदिरातील दानपेटी फोडून चोरीची घटना घडली आहे. मात्र यापूर्वी झालेल्या काही चोºयांचा अद्याप छडा न लागल्याने आणि चोरट्यांनी पुन्हा शहरात चोरीचा मोर्चा वळविल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.पोलादपूरमध्येऐन दिवाळी सणात बंद असणारी अकरा घरे फोडण्याची घटना घडल्यामुळे नागरिकांकडून चिंता व्यक्त करण्यात येत असून याबाबत पोलिसांकडून योग्य उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाRaigadरायगड