शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
4
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
5
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
6
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
7
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
8
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
9
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
10
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
11
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
12
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
13
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
14
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
15
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
16
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
17
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
18
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
19
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
20
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा

माथेरानमधील पॉइंट्सना मिळणार संजीवनी; सुशोभीकरणाची कामे युद्धपातळीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2020 11:50 PM

एमएमआरडीएच्या शिष्टमंडळाने दिली भेट

मुकुंद रांजणे माथेरान : माथेरानमधील २००५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक पॉइंट्सची दुर्दशा झाली होती तर बहुतांश मुख्य पॉइंट्स इतिहासजमा होण्याच्या मार्गावर होते. यासाठी एमएमआरडीएचे मुख्य अभियंता अरविंद धाबे यांना याबाबत माहिती दिल्यावर दोन वर्षांपासून येथील पॅनोरमा, हार्ट आणि मायरा या महत्त्वाच्या पॉइंट्सच्या डागडुजी तसेच सुशोभीकरणाची कामे सध्या युद्धपातळीवर सुरू आहेत. त्यामुळे लवकरच येथील प्रमुख पॉइंट्सला नवसंजीवनी प्राप्त होणार आहे.

मायरा आणि हार्ट पॉइंट्सच्या कामांची पाहणी करण्यासाठी शनिवारी नगर परिषद आणि एमएमआरडीएच्या शिष्टमंडळाने भेट दिली. या वेळी एमएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अभियंता अरविंद धाबे यांच्यासह नगराध्यक्षा प्रेरणा सावंत, नगर परिषद गटनेते प्रसाद सावंत, नगरसेवक नरेश काळे, माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर, सामाजिक कार्यकर्ते तुकाराम आखाडे, सागर पाटील, विजय कदम, आदित्य भिल्लारे यांसह ही कामे पूर्ण करण्यासाठी नेमलेले एन.ए. कन्स्ट्रक्शनचे जुझरभाई आदी उपस्थित होते.

मायरा, हार्ट आणि पॅनोरमा हे मुख्य पॉइंट्स नामशेष होण्याच्या मार्गावर असताना एमएमआरडीएचे अभियंता धाबे यांनी पर्यटनाच्या दृष्टीने या ठिकाणी विकासात्मक कामावर भर दिला. हार्ट आणि मायरा पॉइंट येथे जाण्यासाठी साधी पायवाटसुद्धा उपलब्ध नव्हती. सर्व रस्ता अतिवृष्टीमुळे वाहून गेला होता. पॉइंट्सवरील धोकादायक ठिकाणी काळ्या दगडात ग्याबियन वॉल बांधण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून संरक्षण रेलिंगची कामे सुरू करण्यात येत आहेत.

पर्यटकांना विश्रांतीसाठी बाकडे बसविण्यात येणार आहेत. अतिउताराच्या जागी जांभ्या दगडाच्या पायऱ्यांची कामे लवकरच पूर्ण करण्यात येणार आहेत. मायरा पॉइंटवर एका बाजूला ग्याबियन वॉल बांधण्यात आली आहे, तर दुसºया बाजूला इंदिरा गांधी नगर येथील लोकवस्तीला भविष्यात अतिवृष्टीमुळे धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे घरांच्या संरक्षणासोबत पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी ग्याबियन वॉल बांधण्यात यावी, असे निर्देश नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी धाबे यांना पत्राद्वारे दिले आहेत.

पॉइंटवरील जुन्या झाडांचे संगोपन व्हावे यासाठी जांभ्या दगडात संरक्षक कठडे उभारण्यात यावेत. पॅनोरमा पॉइंट, दस्तुरी पार्किंग आणि मायरा पॉइंटच्या कामांचे उद्घाटन २१ मे या माथेरानच्या वर्धापनदिनी करण्याचे निश्चित केल्याचे गटनेते प्रसाद सावंत यांनी सांगितले.एकंदरीतच सध्या सुरू असलेल्या या महत्त्वाकांक्षी कामांमुळे आगामी काळात पर्यटन व्यवसाय नक्कीच वृद्धिंगत होऊन स्थानिकांना रोजगार मिळेल, अशी आशा या वेळी व्यक्त करण्यात आली.

टॅग्स :Matheranमाथेरान