शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

भूखंड पोलीस क्रीडांगणासाठीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 01:02 IST

रोडपाली येथील भूखंड पोलिसांना देण्याचे सूतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. मात्र, रोडपालीवासीयांनी याला विरोध दर्शवला आहे.

अरुणकुमार मेहत्रेकळंबोली : रोडपाली येथील भूखंड पोलिसांना देण्याचे सूतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. मात्र, रोडपालीवासीयांनी याला विरोध दर्शवला आहे. एकता सामाजिक सेवा संस्थेने थेट मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन आमच्या मुलांनी कुठे खेळायचे कुठे, असा सवाल उपस्थित केला आहे. त्यामुळे हा मुद्दा कळीचा ठरणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.नवी मुंबई पोलीस मुख्यालयाच्या समोर त्याचबरोबर नीलकंठ टॉवरच्या बाजूला सेक्टर १७ येथे क्रीडांगणाकरिता राखीव जागा आहे. येथे क्रीडा संकुल उभारण्याकरिता एका संस्थेला भूखंड देण्यात आला होता, परंतु सभासदांकडून लाखो रुपये जमा करून संस्थाचालक पसार झाले. त्यामुळे क्रीडा संकुलाचा प्रस्ताव रेंगाळला. आता पावणेआठ एकराचा भूखंड मोकळा आहे. रोडपालीला क्रीडांगणाची वानवा असताना सिडकोने अद्यापही ही जागा विकसित केली नव्हती. मात्र, पोलीस क्रीडा स्पर्धेकरिता पोलिसांनी या भूखंडाचा कायापालट केला. मंगळवारी राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही जागा पोलिसांना देण्याबाबत सिडकोला निर्देश देणार असल्याचे जाहीर केले. यावर रोडपाली येथील एकता सामाजिक सेवा संस्थेने आक्षेप नोंदवला आहे.संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत राऊत यांनी याबाबत थेट मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे. या भूखंडाचा पोलिसांनी कायापालट केला. त्याचबरोबर त्यांना क्रीडांगण पाहिजे याबाबत रहिवाशांच्या मनात कोणतेही दुमत नसल्याचे राऊत यांचे म्हणणे आहे. परंतु या ठिकाणी स्थानिक रहिवाशांकरिता क्रीडांगण सिडकोच्यामार्फत विकसित व्हावे अशी आमची न्याय मागणी असल्याचे पत्रात म्हटले आहे. पोलिसांना हे क्रीडांगण दिले तर तिथे सर्वसामान्यांना प्रवेश दिला जाणार नाही. रोडपालीतील नागरिकांचा विचार करून योग्य निर्णय घेण्याची मागणी केली आहे.