शहरं
Join us  
Trending Stories
1
आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
2
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
3
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
4
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
5
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
6
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
7
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
8
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
9
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
10
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
11
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
12
सामान्य माणसाला न्याय हे बळकट लोकशाहीचे प्रतिक - सरन्यायाधीश भूषण गवई
13
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
14
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
15
२०३० पर्यंत मुंबई रेबिजमुक्त करणार; पालिकेचा संकल्प, जनजागृती करणार
16
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
17
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
18
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
19
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
20
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट

प्रदूषित सांडपाणी वाहून नेणारी पाइपलाइन फुटली

By admin | Updated: July 24, 2015 03:21 IST

महाड औद्योगिक वसाहतीतून सोडले जाणारे घातक रसायनयुक्त सांडपाणी सामायिक प्रक्रिया केंद्रात प्रक्रिया केल्यानंतर ओवळे गावानजीक सावित्री खाडीत

सिकंदर अनवारे , दासगावमहाड औद्योगिक वसाहतीतून सोडले जाणारे घातक रसायनयुक्त सांडपाणी सामायिक प्रक्रिया केंद्रात प्रक्रिया केल्यानंतर ओवळे गावानजीक सावित्री खाडीत सोडले जाते. प्रदूषित सांडपाणी वाहून नेणारी ही पाइपलाइन सांडपाणी सोडण्याच्या ठिकाणापासून एक किलोमीटर अंतर आधीच फुटली आहे. गेल्या काही दिवसांपासून ही पाइपलाइन फुटली असून यामुळे लाखो लिटर प्रदूषित सांडपाणी खाडीत विहीत ठिकाणाअगोदर मिसळले जात आहे. यामुळे खाडीपट्ट्यात जाणाऱ्या रस्त्यावर दुर्गंधी पसरली आहे. याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाड औद्योगिक वसाहत प्रशासन या दुरुस्तीच्या कामाकडे चालढकल करीत आहे.महाड औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांतून सोडले जाणारे घातक रसायनयुक्त सांडपाणी औद्योगिक वसाहतीतील सामायिक सांडपाणी प्रक्रि या केंद्रात एकत्रित केले जाते. या ठिकाणी त्यावर प्रक्रि या करून त्या सांडपाण्याचा घातकपणा कमी केला जातो. कितीही प्रक्रि या केली तरी हे घातक रसायनयुक्त सांडपाणी नागरी वस्तीच्या भागात सोडण्याएवढे चांगले होत नसल्याने समुद्र भू-विज्ञान शाखेने हे सांडपाणी समुद्राच्या खोल भागात सोडण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार हे पाणी आंबेत खाडीत सोडणे गरजेचे आहे. मात्र गेली अनेक वर्षे महाड औद्योगिक वसाहतीतून सोडले जाणारे हे सांडपाणी आंबेत ऐवजी ओवळे गावानजीक सोडले जात आहे. ओवळे गावच्या हद्दीतील या विहीत ठिकाणापासून काही अंतर आधीच ही पाइपलाइन फुटली आहे. ही पाइपलाइन फुटून अनेक दिवस उलटून गेले तरी महाड औद्योगिक वसाहत प्रशासनाकडून अद्याप दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले नाही. यामुळे लाखो लिटर प्रदूषित सांडपाणी विहीत ठिकाणापूर्वी खाडीत मिसळले जात आहे. रासायनिक सांडपाणी वाहून नेण्यासाठी महाड औद्योगिक वसाहत ते आंबेत अशी सिमेंट काँक्रि टची पाइपलाइन टाकण्यात आली आहे. ही पाइपलाइन फुटून हे प्रदूषण होत आहे. पावसाचा जोर वाढत आहे. त्यामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत आहे. खाडीचे पाणी वाढले आहे. त्यामुळे जर हे प्रदूषित सांडपाणी योग्य प्रकारे खाडीत मिसळले नाही आणि भरतीच्या पाण्यासोबत खाडीलगतच्या शेतात शिरले तर शेतीचे नुकसान होण्याची भीती नाकारता येत नाही. (वार्ताहर)