शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

माथेरानमध्ये कामाला परवानगी, डिसेंबरपासून कामाला सुरु वात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 02:25 IST

माथेरान, या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असलेल्या ठिकाणी कोणतेही बदल करताना सनियंत्रण समिती आणि वन विभागाच्या परवानग्या यांना मोठे महत्त्व आहे.

अजय कदम माथेरान : माथेरान, या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असलेल्या ठिकाणी कोणतेही बदल करताना सनियंत्रण समिती आणि वन विभागाच्या परवानग्या यांना मोठे महत्त्व आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने माथेरान गावातील मुख्य रस्त्याची नव्याने बांधणी आणि काही प्रमुख प्रेक्षणीय स्थळांचे सुशोभीकरण करण्यासाठी निधी मंजूर केला होता. ९३ कोटींचा निधी सनियंत्रण समिती आणि वनविभागाच्या परवानगीमुळे खर्च होत नव्हता. आॅक्टोबर महिन्यात स्थळ पाहणी करून रायगड वन विभागाने माथेरानमधील पायाभूत सुविधांमधील मैलाचा दगड ठरू शकेल, अशा कामांना परवानगी दिली आहे. त्यामुळे काही महिन्यांनी माथेरान आणखी सुंदर पर्यटन स्थळ बनलेले दिसेल.ब्रिटिशांनी शोधून काढलेल्या माथेरान या पर्यटन स्थळावर त्या वेळपासून वाहनांना बंदी आहे. तेथील निसर्ग आबाधित राखण्यासाठी पर्यावरणप्रेमी संघटना प्रचंड आक्रमक असतात.वाहनांना बंदी असलेल्या लाल मातीचे रस्ते असलेल्या प्रदूषणमुक्त माथेरानमधील प्रत्येक हालचालीवर पर्यावरणप्रेमींचे लक्ष असते. तेथील निसर्गसौंदर्य आबाधित राहावे, म्हणून शासकीय यंत्रणा कायम लक्ष ठेवून असतात. अशा माथेरानसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणने पर्यावरण आबाधित राखत विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. माथेरानला जाण्यासाठी ज्या दस्तुरी नाका येथे वाहने ठेवून पुढे जावे लागते, त्या ठिकाणापासून माथेरान नगरपालिकेपुढे असलेल्या शिवाजी महाराज नगरपर्यंत म्हणजे महात्मा गांधी रस्त्याचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. त्याच वेळी माथेरानमध्ये येणारे पर्यटक हे प्रेक्षणीय स्थळांच्या प्रेमात पडतात. हे लक्षात घेऊन पॅनोरमा पॉइंट, मायरा पॉइंट, हार्ट पॉइंट, एको पॉइंट या चार स्थळांचे सौंदर्य आबाधित राखण्यासाठी रस्ते, सुरक्षा विषयक काळजी घेण्याची कामे प्राधिकरणाने प्रस्तावित केली होती.नेरळ-दस्तुरी नाका-घाट रस्ता आणि पुढील कामांसाठी १२३ कोटींचा निधी प्राधिकरणने मंजूर केला होता. २०१५मध्ये मंजूर झालेला निधी वन विभाग आणि सनियंत्रण समितीच्या परवानगीअभावी खर्च करता आला नव्हता. प्राधिकरणाने डिसेंबर २०१६मध्ये वनविभागाकडे ही कामे करण्यासाठी परवानगी मागितली होती. मात्र, बांधकामांना बंदी असलेल्या आणि वनजमिनीवर कोणतीही कामे करण्यास परवानगी नसल्याने सर्व प्रस्ताव लाल मातीतरु तून बसले होते. सनियंत्रण समितीचे गठन होताच, माथेरान गिरीस्थान नगरपालिकेने प्राधान्य म्हणून एमएमआरडीएच्या कामांना मंजुरी देण्यासाठी आपली भूमिका नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी लावून धरली. आॅगस्ट महिन्यात झालेल्या सनियंत्रण समितीच्या बैठकीत समिती अध्यक्ष निवृत्त सनदी अधिकारी वासुदेव गोरडे यांनी समितीकडून परवानगी दिली होती आणि वन विभागाच्या परवानगीची आवश्यकता निर्देशित केली होती.घोड्यांना क्ले पेव्हर ब्लॉक वरून चालताना कोणताही त्रास होत नसल्याने अश्वपालही नवीन रस्त्याची प्रतीक्षा करीत आहेत.वनविभागाचे उपवनसंरक्षक मनीष कुमार यांच्या पथकाने आॅक्टोबर महिन्याच्या सुरु वातीला एमएमआरडीएने परवानगी मागितलेल्या रस्त्याची, प्रेक्षणीय स्थळांची पाहणी केली. त्यानंतर वन अधिनियम 1980 नुसार काही अटी घालून परवानगी देणारे पत्र जिल्हा उप वनसंरक्षक यांच्या कार्यालयाने २८ आॅक्टोबर रोजी एमएमआरडीएला दिले आहे.1907 च्या मुंबई गॅझेटमध्ये माथेरानमधील रस्त्यांची लांबी-रुं दी नमूद केली आहे. त्याच भागात प्राधिकरणला कामे करण्याची परवानगी दिली आहे. माथेरान आणि घोडे हे समीकरण असून, घोड्यांना चालताना त्रास होऊ नये म्हणून दगडांपासून बनलेले पेव्हर ब्लॉक या रस्त्यांसाठी वापरले जाणार आहेत. माथेरानमध्ये यापूर्वी दोन रस्ते क्ले पेव्हर ब्लॉकने तयार केले असून, तो प्रयोग यशस्वी झाल्याने महात्मा गांधी रस्ता क्ले पेव्हर ब्लॉकचा केला जाणार आहे. सध्या माथेरानमधील रस्ता अर्धा पेव्हर ब्लॉक आणि अर्धा मातीचा आहे.

टॅग्स :Matheranमाथेरान