शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

शाब्दिक चुकीमुळे रखडली होती परवानगी, रायगड जिल्हाधिकाऱ्यांचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2020 02:20 IST

Raigad News : २० नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी आदेशपत्रात ''सर्व जिल्ह्यांतील समुद्रकिनारी चालविले जाणारे विविध जलक्रीडा प्रकार'' असा गोंधळात आणि अर्थ स्पष्ट न होणारा शब्द वापरला होता.

अलिबाग : पर्यटन व्यवसायाला परवानगी देताना रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेश पत्रातील एका छोट्याशा शाब्दिक चुकीमुळे जलक्रीडा व्यावसायिकांचा व्यवसाय बुडाला होता. अखेर ही चूक शब्दांच्या रचनेमुळे झालेली आहे, असा खुलासा करत, जिल्हाधिकारी  निधी चौधरी यांनी जलक्रीडा व्यावसायिकांना व्यवसाय करण्यास कोणतीही हरकत नसल्याचे सांगितले आहे.२० नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी आदेशपत्रात ''सर्व जिल्ह्यांतील समुद्रकिनारी चालविले जाणारे विविध जलक्रीडा प्रकार'' असा गोंधळात आणि अर्थ स्पष्ट न होणारा शब्द वापरला होता. वास्तविक, या ठिकाणी ''रायगड जिल्ह्यातील सर्व समुद्रकिनारे'' असा शब्द वापरणे आवश्यक होता. किनारपट्टीचे जिल्हे वगळता इतर जिल्ह्यांमध्ये समुद्र किनारे नाहीत. त्याचबरोबर, मुंबईमध्ये कोरोनाची स्थिती गंभीर असल्याने तेथे जलक्रीडा प्रकारांना परवानगी देण्यात आलेली नाही. इतर जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांना परवानगी देता येत नसल्याने बंदर विभागाने या आदेशाची अंमलबजावणी करण्यास नकार दर्शविला होता.या शाब्दिक चुकीमुळे बंदर विभागाने रायगड जिल्ह्यातील जलक्रीडा प्रकारांना परवानगी नाकारली होती. अखेर जलक्रीडा व्यावसायिक अलिबाग येथील शिवनाथ पाटील, परेश पाटील, अमित पेरेकर, नागाव येथील प्रफुल्ल बानकर यांनी पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या समक्ष जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची भेट घेत  परवानगी मिळण्यासाठी विनंती  केली होती.  

व्यावसायिकांना दिलासासर्व प्रकार शाब्दिक रचनेमुळे  झालेला असून, बंदर विभागाला  याची अंमलबजावणी करणे गरज असल्याचे जिल्हाधिकारी निधी  चौधरी यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे मागील २० नोव्हेंबरला आदेश  मिळूनही व्यवसाय सुरू न करू शकलेल्या  रायगडमधील जलक्रीडा व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.  

टॅग्स :Raigadरायगड