शहरं
Join us  
Trending Stories
1
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
4
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
5
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
6
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
7
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
8
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
9
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
10
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
11
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
12
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
13
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
14
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
15
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
16
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
17
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
18
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
19
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
20
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात

कायमस्वरूपी पोषण व पुनर्वसन केंद्रे सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 4:16 AM

कर्जत तालुक्यात ग्राम बाल पोषण केंद्रे (व्हीसीडीसी) व पोषण पुनर्वसन केंद्रे (एनआरसी) कायमस्वरूपी सुरू करण्यात येतील,

अलिबाग : कर्जत तालुक्यात सामाजिक संस्थांच्या पुढाकाराने आणि विविध शासकीय विभागाच्या समन्वयातून राबवण्यात आलेली आणि यशस्वी झालेली कुपोषणमुक्त कर्जत मोहीम ही जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून जिल्ह्यात सर्वत्र राबवण्यात आणि त्याच बरोबर कर्जत तालुक्यात ग्राम बाल पोषण केंद्रे (व्हीसीडीसी) व पोषण पुनर्वसन केंद्रे (एनआरसी) कायमस्वरूपी सुरू करण्यात येतील, अशी घोषणा रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी गुरुवारी नेरळ येथे बोलताना केली आहे.दिशा केंद्र (कर्जत) आणि प्रगती संस्था (चवणे) या दोन सामाजिक संस्थांच्या पुढाकाराने व एकात्मिक आदिवासी विकास विभागाच्या सहयोगाने गेल्या २५ एप्रिलपासून कर्जत तालुक्यात आयोजित कुपोषणमुक्त कर्जत मोहिमेच्या पहिल्या टप्प्याच्या मोहिमेच्या समारोपानिमित्त नेरळ येथील शेतकरी भवनात आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी बोलत होते. या वेळी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर, कर्जत उपविभागीय महसूल अधिकारी दत्ता भडकवाड, एकात्मिक आदिवासी प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी गजेंद्र केंद्रे, महिला बालकल्याण सभापती उमा मुंढे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी, कर्जत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सी. के. मोरे, सहायक आदिवासी प्रकल्प अधिकारी डी. डी. काळपांडे, कर्जतच्या गटविकास अधिकारी डॉ. शबाना मोकाशी आदी मान्यवर उपस्थित होते.जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी पुढे म्हणाले, कर्जत तालुक्यात ज्या पद्धतीने आरोग्य विभाग, एकात्मिक बालविकास व महसूल विभागाचा समन्वय घडवून आणला गेला, तसाच समन्वय सर्व तालुक्यांत होण्यासाठी जिल्ह्यातील सर्व उप विभागीय महसूल अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समितीची स्थापना केली जाईल आणि या विभागीय समन्वय समितीच्या माध्यमातून जिल्हा कुपोषणमुक्त करण्यासाठी प्रयत्न केला जाईल. ही मोहीम यशस्वी केल्याबद्दल जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी आरोग्य व महिला, बाल विकास विभागाचे विशेष अभिनंदन करून, या यशस्वी मोहिमेचा एकत्रित अहवाल (डाक्युमेंट) कर्जत उपविभागीय महसूल अधिकारी दत्ता भडकवाड यांनी तयार करून जिल्ह्याला सादर करावा, ज्याच्या आधारावर ही मोहीम जिल्हाभर राबवली जाऊ शकेल, असे त्यांनी अखेरीस सांगितले.कुपोषण होऊ नये, यासाठी जनजागृतीकर्जत तालुक्यात राबविण्यात आलेल्या या मोहिमेत प्रत्येक प्राथमिक केंद्रांतर्गत असलेल्या अंगणवाड्यांमधील कुपोषित मुले, गरोदर माता, स्तनदा माता, तसेच एड्स, टीबी या आजारांच्या रुग्णांची तपासणी व उपचार करण्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. कुपोषणाच्या सामाजिक कारणाचा ऊहापोह करून भविष्यात कुपोषण होऊ नये, यासाठी काय खबरदारी घ्यावी, याबाबत जनजागृती या वेळी करण्यात आली.कुपोषणमुक्त कर्जतचा नागरिकांना लाभकुपोषणमुक्त कर्जत मोहिमेत एकूण सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांतील ३३५ अंगणवाड्यांमधील दोन हजार ३०० नागरिकांनी लाभ घेतला आहे. शिबिर यशस्वी करण्यासाठी नेरळमधील उद्योजक भगवान चंचे, नेरळचे तलाठी एच. एन. सरगर, दिशा केंद्र व प्रगती संस्थेच्या कार्यकर्त्यांनी विशेष प्रयत्न केल्याचे या मोहिमेचे मुख्य समन्वयक दिशा केंद्राचे कार्यकारी संचालक अशोक जंगले यांनी सांगितले.

टॅग्स :Raigadरायगड