शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा असीम मुनीर म्हणजे दुसरा लादेन; अमेरिकेतूनच टीका होऊ लागली
2
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
3
धनंजय मुंडेंकडून CM फडणवीसांबद्दल भर सभेत गौरवोद्गार, कौतुकाच्या माळेतून मंत्रि‍पदाची गळ?
4
यासिन मलिकच्या घरासह श्रीनगरमध्ये ८ ठिकाणी छापे; ३५ वर्षे जुन्या सरला भट्ट हत्या प्रकरणात कारवाई
5
अनेक वर्षांनी कार्यकर्ता भेटला तरी नावाने हाक मारणारे शरद पवार ‘ती’ नावे कसे विसरले?
6
"मला दोन मिनिटांतच समजेल..., भारतावर लादलेल्या टॅरिफने..."; अलास्कातील बैठकीपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतीन यांना थेट इशारा! 
7
सोने खरेदीची सुवर्णसंधी! एकाच दिवसात सोने १४०० रुपयांनी स्वस्त, ट्रम्प यांच्या घोषणेचा परिणाम!
8
"लग्न करायचंय, धर्म बदल"; प्रियकरानं टाकला दबाव, कुटुंबानं दिला त्रास, वैतागलेल्या तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल!
9
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
10
Asia Cup 2025 : जसप्रीत बुमराह खेळणार का? गिलसंदर्भात काय शिजतोय प्लॅन? जाणून घ्या सविस्तर
11
क्रिकेटपटू आकाशदीपने नवी कोरी फॉर्च्युनर घेतली; महागात पडली, डीलरही गोत्यात
12
IPL सट्टेबाजी: धोनीच्या १०० कोटींच्या मानहानीच्या दाव्याबाबत उच्च न्यायालयाची मोठी कारवाई
13
"भारताविरोधात माझा मुलगा लढेल, तो शहीद झाला तर नातू लढेल"; आसिम मुनीर अमेरिकेत जाऊन काय बोलले?
14
Maratha Morcha: ऐन गणेशोत्सवात मनोज जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मराठा आंदोलकांच्या मोर्चामुळे ताण वाढणार!
15
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'
16
उशिरा आयटी रिटर्न भरणाऱ्यांनाही रिफंड! करप्रणाली अधिक सोपी, पारदर्शक आणि आधुनिक होणार
17
"खोलीत बोलवायचे, घाणेरड्या नजरेने बघायचे, रात्री व्हिडीओ..."; IAS अधिकाऱ्याविरोधात महिलांचे गंभीर आरोप 
18
शेअर बाजारात आधी घसरण मग तेजी; 'या' स्टॉक्सनं घसरणीसह सुरू केला व्यवहार
19
भिवंडीत भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षासह दोन जणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; परिसरात तणावाचे वातावरण 
20
'वीण दोघांतली ही तुटेना'चा पहिला एपिसोड पाहून काय म्हणाले प्रेक्षक, सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस

पेण ग्रामीण रुग्णालय विविध समस्यांनी ग्रस्त; डॉक्टरांंची कमतरता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 22:59 IST

गैरसोयींमुळे रु ग्णांची खासगी रुग्णालयांकडे धाव

- दत्ता म्हात्रे पेण : ग्रामीण रुग्णालयातील विविध समस्यांमुळे रुग्ण खासगी रुग्णालयाकडे धाव घेत आहेत. यामुळे पेणमधील सर्व खासगी रुग्णालयात गर्दी दिसत आहे. परिणामी, पेणच्या शासकीय ग्रामीण रुग्णालयातील रिकाम्या खाटा रु ग्णांची वाट बघत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. या रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची एकूण आठ महत्त्वाची पदे कार्यरत असल्याची नोंद जरी असली तरी दोनच डॉक्टर कायमस्वरूपी या रुग्णालयात रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध आहेत.

उर्वरित सहा वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे भरली गेली नसल्याने रिक्त आहेत. या रुग्णालयात रुग्णांसाठी आणखी तीन डॉक्टरांची व्यवस्था जरी करण्यात आली असली तरी हे डॉक्टर कायमस्वरूपी नसून, ते मानधनावर आपले कामकाज करीत आहेत. पेण येथील उपजिल्हा रुग्णालयात लाखो रुपये खर्च करून रक्त संकलन मशिन आणण्यात आलेली आहे. मात्र, ही मशिन हाताळण्यासाठी तज्ज्ञ व्यक्ती नसल्याने गेल्या अनेक महिन्यांपासून धूळखात पडलेली आहे. या रुग्णालयात दातांचे डॉक्टर उपलब्ध नसल्याने तीही मशिन तशीच पडून आहे.

वैद्यकीय शाखेतील कोणत्याही प्रकारचा सर्जन या रुग्णालयात उपलब्ध नसल्याने आलेल्या कोणत्याही रुग्णाची सर्जरी केली जात नाही. परिणामी, रुग्णाला इतर ठिकाणच्या रुग्णालयात हलवावे लागते. याचा त्रास रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांना होत आहे. शासनाने रुग्णांना आर्थिक भुर्दंड पडू नये, यासाठी शासकीय रुग्णालयात कमी किमतीत किंवा मोफत सुविधा मिळाव्यात, यासाठी अनेक योजना पर्याय खुले केले आहेत.

अद्ययावत मशिनरी शासनाकडून उपलब्ध होत आहेत. मात्र, पेण उपजिल्हा रुग्णालयात मशिनरी असूनही हाताळण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर भरले जावेत आणि इतर गैरसोयींबाबत त्वरित संबंधित विभागाला आदेश द्यावेत, अशी मागणी नागरिक करत आहेत. पेणमधील सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटना, राजकीय मंडळी यांनी पेणमधील ग्रामीण जनतेला आधारवड असलेल्या या रुग्णालयाच्या विविध गैरसोयींबाबत एकत्रितपणे पुढे सरसावून आरोग्य मंत्रालयाकडे पत्रव्यवहार करावा; पेण ग्रामीण रुग्णालयाला पुन्हा गतवैभव प्राप्त करून द्यावे, अशी येथील नागरिकांची अपेक्षा आहे. याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक अजित गवळी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

सोनोग्राफी मशिन नसल्याने अडचण

1. येथे येणाºया डॉक्टरांच्या हजेरी नोंदणीसाठी लावण्यात आलेली बायोमेट्रिक मशिन मागील दोन ते तीन महिन्यांपासून बंद असल्याने शासनाने ही मशिन प्रत्येक कार्यालयात लावणे बंधनकारक असल्याने काढलेल्या शासकीय आदेशाला या रुग्णालयाकडून केराची टोपली दाखविण्यात आलेली आहे.

2. या रुग्णालयात रुग्णांसाठी आवश्यक असणारी सोनोग्राफी मशिनही उपलब्ध नसल्यानेही रुग्णांची गैरसोय होत आहे.

3.पेण उपजिल्हा रुग्णालयात असणाºया या समस्यांचा डोंगर पाहून आणि येथील गैरसोयींचा अनुभव अनेक रुग्णांना आल्याने पेणमधील जवळपास ७० टक्के रुग्ण हे खासगी रुग्णालयांचा पर्याय निवडतात. त्यामध्ये खासगी रुग्णालयात या रुग्णांना आर्थिक फटका बसत आहे.स्त्रीरोगतज्ज्ञ नाही.

रुग्णालयात प्रसूतीसाठी महिला रुग्णांच्या तपासणीसाठी तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने एखाद्या महिलेवर प्रसंगाअंति शस्त्रक्रिया किंवा त्या महिलेस उपचार करायचे झाल्यास, अलिबागहून स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरांना पाचारण करण्यात येते. एवढेच नव्हे तर या रुग्णालयातील अ‍ॅडमिट करण्यात आलेल्या रुग्णाला विशेष करून गरोदर महिलेला सकाळी अंघोळीला देण्यात येणाºया पाण्यासाठी असलेली सोलर मशिनही बंद असल्याने त्यांना गरम पाण्याऐवजी थंड पाण्यातच अंघोळ करावी लागत आहे.

रुग्णालय परिसरात अस्वच्छता

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात स्वच्छ भारत अभियानाचा नारा दिलेला असतानाच या शासकीय रुग्णालयाच्या परिसरात मात्र स्वच्छतेचे तीन-तेरा वाजलेले दिसत आहेत. या अस्वच्छतेमध्ये आलेला रुग्ण बरा होण्याऐवजी अधिकच आजार बळावण्याची किंवा इतर आजार त्यांना जडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अद्ययावत मशिनरी शासनाकडून उपलब्ध होत आहेत. मात्र, पेण उपजिल्हा रुग्णालयात मशिनरी असूनही हाताळण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने मोठी गैरसोय होत आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलRaigadरायगडMaharashtraमहाराष्ट्र