शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पेण रेल्वे धडक मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2018 02:22 IST

पेणच्या गणेशमूर्ती निर्मात्याच्या नगरीत जलद गाड्यांना थांबा मिळावा, तत्काळ शटल सेवा सुरू करावी. या प्रमुख मागण्यांसह मी पेणकर आम्ही पेणकर या मंचातर्फे पेणकर नागरिकांनी स्वातंत्र्यदिनी पेण रेल्वेस्थानकांत मोर्चाने येऊन रेल्वे प्रशासनाला निवेदन दिले.

पेण : पेणच्या गणेशमूर्ती निर्मात्याच्या नगरीत जलद गाड्यांना थांबा मिळावा, तत्काळ शटल सेवा सुरू करावी. या प्रमुख मागण्यांसह मी पेणकर आम्ही पेणकर या मंचातर्फे पेणकर नागरिकांनी स्वातंत्र्यदिनी पेण रेल्वेस्थानकांत मोर्चाने येऊन रेल्वे प्रशासनाला निवेदन दिले. या वेळी रेल्वे प्रशासनाच्या भोंगळ कारभाराच्या निषेधार्थ घोषणाही देण्यात आल्या. सुमारे १५० नागरिक मोर्चात सहभागी झाले होते.पेणकरांची अनेक वर्षांची असलेली प्रमुख मागणी आजपर्यंत पूर्ण झालेली नाही. मात्र, रोहा-दिवा पॅसेंजरला १२ ऐवजी १५ डबे, पेण स्थानकातून रिटर्न तिकीट सुविधा फलाटाची लांबी वाढविणे या सुविधा तुटपुंजा आहेत. त्यापेक्षा प्रशासनाने प्रमुख अशा मागण्यांकडे लक्ष देणे अधिक गरजेचे होते. असे मोर्चेकऱ्यांचे म्हणले होते. त्यामुळे प्रशासनावर रोष प्रकट करीत मोर्चेकºयांनी आपला निषेध या आंदोलनाद्वारे व्यक्त केला.पेण रेल्वेस्थानकांच्या अंतर्गत प्रवेशद्वारावर रेल्वे पोलिसांचे भक्कम कडे उभे होते. तर पेणच्या हद्दीत पेण पोलसांचे सुरक्षा कवच होते. एवढा भक्कम संरक्षण असल्यामुळे मोर्चेकºयांना रेल रोको करण्याची संधीच मिळाली नाही. त्यानंतर मागण्याचे निवेदन देऊन मोर्चेकºयांनी आपले आंदोलन संपविले.पेणकरांच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणेतत्काळ पेण-पनवेल शटल सेवा सुरू करावी.रोजच्या रेल्वे अर्थात जलद गाड्या गणपती होळी व हॉलिडेच्या दिवसांत स्थानकांत दोन मिनिटे थांबाव्यात.रेल्वे स्थानकाच्या दर्शनी भागात रस्त्याची दुरुस्ती, पथदिवे व परिसर सुशोभीकरण करावे.पेण स्थानकात पिण्याचे पाणी व महिला-पुरुष स्वच्छतागृहांची प्रत्येक फलाटात निर्मिती करावी.प्रवासी विश्रांतिगृहांची सुविधा करण्यात यावी व इतर मागण्यांचे निवेदन या आंदोलनाप्रसंगी देण्यात आले बिगर राजकीय मोर्चा असल्याने या मोर्चामध्ये कमी उपस्थिती जाणवली.

टॅग्स :newsबातम्याRaigadरायगड