शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

नेरळ ग्रामपंचायतीने उभारला पादचाऱ्यांसाठी साकव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 02:52 IST

ग्रामपंचायतीने मातीचा भराव टाकून रस्ता केला होता. हा टाकलेला मातीचा भराव पावसाळ्यात वाहून जाणार असल्याने याठिकाणी ग्रामपंचायतीने तात्पुरत्या स्वरूपात पादचा-यांसाठी लोखंडी साकव उभारला आहे.

- कांता हाबळे नेरळ : नेरळ शहरातील मोहाचीवाडी येथील जीर्ण झालेला साकव तीन महिन्यांपूर्वी कोसळला होता. तेव्हापासून या ठिकाणी नव्याने साकव उभारण्यात आला नव्हता. या ठिकाणी ग्रामपंचायतीने मातीचा भराव टाकून रस्ता केला होता. हा टाकलेला मातीचा भराव पावसाळ्यात वाहून जाणार असल्याने याठिकाणी ग्रामपंचायतीने तात्पुरत्या स्वरूपात पादचा-यांसाठी लोखंडी साकव उभारला आहे. त्यामुळे पावसाळ्यात परिसरातील नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे. परंतु हा छोटा साकव असल्याने या साकवावरून कोणतेही वाहन नेण्यास बंदी घालण्यात आली आहे.नेरळ शहरात येण्यासाठी मोहाचीवाडी आणि परिसरातील आदिवासी ग्रामस्थांसाठी काही वर्षांपूर्वी मोहाचीवाडी साकव उभारण्यात आला होता. तो साकव जीर्ण झाला असल्याने तीन महिन्यांपूर्वी खडीने भरलेला ट्रक जात असताना तो कोसळला व त्यात ट्रक अडकला होता. साकव तुटल्यानंतर अनेक नेत्यांनी या ठिकाणी भेटी देऊन पाहणी केली, तर काही नेत्यांनी या साकवाला निधी मंजूर करून दिला. परंतु दोन महिने उलटूनही याठिकाणी नव्याने साकव उभारण्यात आला नव्हता. त्या ठिकाणी ग्रामपंचायतीने मातीचा भराव टाकून तात्पुरता ये-जा करण्यासाठी रस्ता तयार केला होता.या पुलासाठी निधी मंजूर झाला आहे. परंतु निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाल्याने या ठिकाणी नव्याने पूल उभारण्यासाठी काही अडचणी येत असल्याचे समजते. म्हणून नेरळ ग्रामपंचायतीने पावसाळ्यात मोहाचीवाडी व परिसरातील नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून या ठिकाणी पादचाºयांसाठी अंदाजे २ लाख रुपये खर्च करून छोटा लोखंडी साकव उभारला आहे. या लोखंडी साकवामुळे पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय दूर होणार असली तरी या साकवावरून वाहन नेण्यास बंदी घालण्यात आली आहे.>तुटलेल्या साकवासाठी निधी मंजूर झाला आहे. परंतु निवडणुकीची आचारसंहिता असल्याने या कामाच्या वर्कआॅर्डरचे काम बाकी आहे. त्यामुळे हे बांधकाम होण्यास वेळ लागणार असल्याने तात्पुरता पावसाळ्यात ग्रामस्थांची गैरसोय होणार नाही म्हणून अंदाजे २ लाख रुपये खर्च करून हा लोखंडी साकव उभारला आहे, परंतु या साकवावरून वाहने नेण्यास बंदी आहे.- मंगेश म्हसकर, सदस्य, नेरळ ग्रामपंचायत