शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

बायोमेट्रिकमुळे होणार वेळेत पगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 00:16 IST

रायगड जिल्हा परिषद। आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पगारास होतो विलंब

अलिबाग : रायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत सेवेत असलेल्या डॉक्टर्स ते शिपाई अशा एकूण ८३९ अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पगार होण्यास विलंब होत असून अनेकांचे बँक कर्ज हप्ते थकल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याबाबत शुक्रवारी ‘लोकमत’ने बातमी प्रसिद्ध के ली होती. यानंतर रायगड जिल्हा परिषदेत एकच धावपळ उडाली. पगार फायलींच्या निर्गतीस विक्रमी वेग आला आणि पगार जमा होण्यास प्रारंभ झाल्याने आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टरांनी समाधान व्यक्त केले.

आधार लिंक वेतन प्रणाली प्रभावीपणे रावबून कोणत्याही परिस्थितीत ही प्रणाली १ जून २०१९ पासून वापरात आणण्याबाबत आरोग्य सेवा विभागाच्या मुंबई मंडळाचे उप संचालक यांनी दिलेल्या निर्देशानुसार, पगारास होणार विलंब टाळण्याकरिता आरोग्य विभागातील डॉक्टर्स आणि कर्मचाºयांच्या दैनंदिन हजेरी नोंदीकरिता आधार लिंक बायोमेट्रिक प्रणाली अमलात आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसे परिपत्रक रायगड जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन देसाई यांनी सर्व तालुका आरोग्य अधिकारी, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, दवाखाने व पथके यांना शुक्रवारी पाठविले आहे.आपल्या अधिपत्याखालील एकही संस्था व एकही अधिकारी व कर्मचारी आधार लिंक बायोमेट्रिक प्रणाली शिवाय राहाणार नाही. त्याचप्रमाणे सर्व संस्थेमध्ये १ जून २०१९ पूर्वी आधार लिंक बायोमेट्रिक प्रणाली वापरात येऊन जून २०१९चे वेतन या प्रणालीनुसार अदा करण्यात यावे, याची आपल्या सत्रावर दक्षता घेण्यात यावी, असे आदेश सर्व तालुका अधिकाºयांना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. देसाई यांनी दिले आहेत.

जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालया मार्फत वैद्यकीय अधिकाºयांचे मासिक वेतन या प्रणालीतील हजेरीनुसार अदा करण्यात येणार आहे. सर्व तालुका अधिकारी व प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकाºयांनी कर्मचाºयांची त्यांच्या स्तरावर वेतन देयके तयार करताना प्रणालीतील हजेरीनुसार वेतन देयके तयार करावीत. ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रांनी अद्यापही बायोमेट्रिक मशिन्स बसवले नसतील त्यांनी तत्काळ त्याबाबत कार्यवाही करावी. याबाबात दिरंगाईस संबंधित तालुका अधिकारी व वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र हे जबाबदार राहातील. तसेच प्रणालीतील हजेरी नुसार संबंधित प्रा.आ. केंद्रातील कर्मचाºयांना वेतन मिळणार आहे. मशिन्स चालू राहातील या बाबत दक्षता घ्यावी, असेही या आदेशात नमूद केले आहे.दांडीबहाद्दरांची होणार अडचणआधार लिंक बायोमेट्रिक प्रणालीमुळे दांडीबहाद्दर अधिकारी व कर्मचाºयांची मोठी अडचण होणार आहे. अनेक अधिकारी कार्यालयात कार्यालयीन वेळत येत नाहीत तर कार्यालयीन वेळेआधी निघून जातात, याची अनुभूती यापूर्वी अनेकदा आली आहे. आरोग्य उपसंचालकांच्या २२ आॅगस्ट २०१७ च्या आदेशान्वये आधार लिंक बायोमेट्रिक प्रणाली तेव्हाच अमलात येणे अपेक्षित होते. मात्र, दांडीबहाद्दरांच्या सोईसाठी ती अमलात आणली नव्हती, अशी माहिती आरोग्य विभागातून प्राप्त झाली आहे. परिणामी, १ जूनपासून ही प्रमाणी प्रत्यक्ष कार्यान्वित होईल, या बाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे.